Advertisement

रेल्वे प्रवाशांना दिलासा! मुंबई-सिकंदराबाद, मुंबई-नांदेड गाड्या पुन्हा सुरू

मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांना दिलासा देत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सिकंदराबाद (व्हाया नांदेड) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- हुजूर साहेब नांदेड या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.

रेल्वे प्रवाशांना दिलासा! मुंबई-सिकंदराबाद, मुंबई-नांदेड गाड्या पुन्हा सुरू
SHARES

मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांना दिलासा देत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सिकंदराबाद (व्हाया नांदेड) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- हुजूर साहेब नांदेड या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. 

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हुजूर साहेब नांदेड विशेष ट्रेन

०७६१२- ही दररोज धावणारी विशेष ट्रेन ४ डिसेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ६.४५ वाजता रवाना होईल आणि हुजूर साहेब नांदेड इथं दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता पोहोचेल.

०७६११- दररोज धावणारी विशेष ट्रेन ३ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली आहे. ही ट्रेन हुजूर साहेब नांदेडवरून रात्री १०.०० वाजता रवाना होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०७ वाजता पोहोचेल.

ही ट्रेन (०७६११) ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मनवाथ रोड, परभणी आणि पूर्णा जंक्शन इथं थांबेल. 

या ट्रेनमध्ये एक एसी-२ टिअर, एक एसी-३ टिअर, एक एसी चेअर कार, ३ स्लीपर क्लास आणि ११ सेकंड सीटींग बाेगी असतील.

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सिकंदराबाद व्हाया हुजूर साहेब नांदेड विशेष ट्रेन

०७०५७- दररोज धावणारी विशेष ट्रेन ६ डिसेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री ९.३० वाजता रवाना होऊन सिकंदराबादला दुसऱ्या दिवशी दुपारी २.४० वाजता पोहोचेल.

०७०५८- दररोज धावणारी विशेष ट्रेन ५ डिसेंबर २०२० पासून सिकंदराबादवरून दुपारी १.२५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. 

ही ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, कसारा (०७०५७), नाशिक रोड, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मनवाथ रोड, परभणी, पूर्णा जं, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बसर, निझामाबाद, कमारेड्डी, अकनपेट, मिर्झापली आणि बोलारम या स्थानकांवर थांबेल. 

या ट्रेनमध्ये एक फर्स्ट एसी, दोन एसी २ टिअर, तीन एसी-३ टिअर, १० स्लीपर क्लास आणि ५ सेकंड सीटींग बाेगी असतील.

या ट्रेनमध्ये केवळ तिकीट कन्फर्म झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येईल. प्रवाशांना www.irctc.co.in या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करता येतील. कोविड संदर्भातील सर्व नियमांचं पालन करणं प्रवाशांना बंधनकारक असेल. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा