Advertisement

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी ६ विशेष गाड्या

मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनानं कोकणात जाणाऱ्या ६ गणपती विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, तात्पुरत्या स्वरूपाचा थांबा देत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी ६ विशेष गाड्या
SHARES

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरूवात झाली आहे. अवघे काहीच दिवस शिल्लक राहिल्यानं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची धावपळ पाहायला मिळते आहे. दरवर्षी कोकणात रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं अनेक प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करतात. मात्र, त्यावेळी मुंबई-कोकण महामार्गावरील खड्डे, खासगी बसची अवाजवी दरवाढ, एसटी महामंडळाची मर्यादित सेवा या अडचणींना प्रवाशांना समोरं जावं लागतं. त्यामुळं प्रवाशांची गैस सोय होऊ नये यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनानं कोकणात जाणाऱ्या ६ गणपती विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, तात्पुरत्या स्वरूपाचा थांबा देत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

गाडी क्रमांक ११००३/११००४ दादर सावंतवाडी रोड-दादर तुतारी एक्स्प्रेस या एक्सप्रेच्या वेळेत २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीदरम्यान बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, दादर येथून रात्री १२.१० सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुपारी १२.२५ वाजता पोहचेल. याआधी ही एक्सप्रेस ११.४५ सुटत होती.

जनशताब्दीला सावंतवाडी थांबा

दादर-मनमाड-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसला सावंतवाडी स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. ३० ऑगस्टपासून ६ महिन्यांसाठी हा थांबा असणार आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस पहाटे ५.२५ वाजता दादर स्थानकातून सुटणार असून दुपारी १.४६ वाजता सावंतवाडी स्थानकात पोहोचेल. परतीच्या प्रवासावेळी दुपारी १२.१५ वाजता रवाना होणार असून, दुपारी १.३० वाजता सावंतवाडी स्थानकात पोहचेल.

६गणपती विशेष ट्रेन

पुणे-सावंतवाडी रोड-एलटीटी ( फेऱ्या)

पुणे-सावंतवाडी रोड-एलटीटी ही गाडी २९ ऑगस्टला पुण्याहून रात्री १२.१० वाजता सुटणार असून, पहाटे ४ वाजता सावंतवाडी रोड पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासावेळी सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी ५.२० वाजता सुटणार असून, दुपारी ४.५० वाजता एलटीटी इथं पोहोचणार आहे.

एलटीटी-सावंतवाडी रोड-पनवेल ( फेऱ्या)

एलटीटी-सावंतवाडी रोड-पनवेल ही गाडी ३० ऑगस्टला एलटीटीहून संध्याकाळी ५.५० वाजता सुटणार असून सकाळी ६.३० वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासावेळी सावंतवाडी रोड स्थानकातून सकाळी १०.५५ वाजता सुटून पनवेलला रात्री ११.४० वाजता पोहचेल.

पनवेल-सावंतवाडी रोड-पुणे ( फेऱ्या)

पनवेल-सावंतवाडी रोड-पुणे ही गाडी ३१ ऑगस्टला पनवेलहून मध्यरात्री १२.५५ ला सुटणार असून, दुपारी २.१० वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासावेळी सावंतवाडी रोड स्थानकातून दुपारी ३.२० वाजता सुटून पुणे स्थानकात स. .२५ वाजता पोहोचणार आहे.



हेही वाचा -

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

चौकशी राज ठाकरेंची झोप उडाली पोलिसांची



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा