Advertisement

'या' एक्स्प्रेस १० दिवसांसाठी राहणार बंद


'या' एक्स्प्रेस १० दिवसांसाठी राहणार बंद
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील प्रगती, कोयना एक्सप्रेससह ६ एक्सप्रेस १० दिवसांसाठी बंद राहणार आहेत. कारण मध्य रेल्वे प्रशासनानं मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्र परिसरात तांत्रिक आणि दुरूस्तीचं कामं हाती घेतलं आहे. या कामासाठी हा मार्ग १० दिवसांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं कोयना, प्रगती, नांदेड-पनवेल, मुंबई-हैदराबाद, बीजापूर-मुंबईसह इतर ६ रेल्वे गाड्यांनी प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

दुरूस्तीचं काम

दुरूस्तीच्या कामावेळी कोयना एक्स्प्रेस पुण्यातून सोडण्यात येणार आहे. तसंच, पुणे-मुंबई या मार्गावर धावणारी प्रगती एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी ५ ते १४ ऑक्टोबर या काळात दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे.  हैदराबाद, विशाखापट्टनम, नांदेड या गाड्याही पुण्यापर्यंतच धावणार आहेत.  तर हैदराबाद-मुंबई, मुंबई-पंढरपूर पॅसेंजर, मुंबई-विजापूर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरड कोसळली

याआधी पावसामुळं मंकी हिलजवळ दरड कोसळली होती. त्यामुळं २६ जुलै ते १० ऑगस्ट या कालावधीत हा मार्ग बंद ठेवण्यात आलहोता. त्यानंतर आता पुन्हा या मार्गावरील रेल्वेगाड्या १० दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.  त्यामुळं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

'हे' ४ दिवस दारुविक्री बंद

राज्यभरात ५ दिवस ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा