Advertisement

राज्यभरात ५ दिवस ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज


राज्यभरात ५ दिवस ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज
SHARES

मुंबईसह उपनगरात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला हजेरी लावलेल्या मुसळधार पावसानं विश्रांती घेतली आहे. मागील काही दिवस मुंबईकरांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र, अस असताना पुढील ५ दिवस राज्यात ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

वादळी पावसाचा अंदाज

७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. नाशिक सह खान्देश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ तारखे पर्यंत काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसकट पावसाची शक्यता आहे. तसंच,नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत काही भागात १२ तारखेपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ तारखे पर्यंत राहणार आहे. त्याशिवाय, विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ तारखेपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ गर्जनेसकट पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा -

जेजे आणि टाटा रुग्णालयांचा पंतप्रधानांकडून सन्मान

'आरे वृक्षतोड'प्रकरण: अटक झालेल्या 'त्या' पर्यावरणप्रेमींना जामीन मंजूरसंबंधित विषय
Advertisement