Advertisement

जे.जे., टाटा रुग्णालयांचा पंतप्रधानांकडून सन्मान


जे.जे., टाटा रुग्णालयांचा पंतप्रधानांकडून सन्मान
SHARES

आयुषमान भारत योजनेला एक वर्ष पूर्ण झालं असून या योजनेमध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या रुग्णालयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जे.जे. आणि टाटा कॅन्सर रुग्णालय या २ रुग्णालयांचा समावेश आहे.समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्ययोजनेचा लाभ मिळावा यासाठी आयुषमान भारत योजना सुरू करण्यात आली होती. 

२ रुग्णालयांचा गौरव

दिल्ली येथील विज्ञानभवन इथं हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.जेआणि टाटा कॅन्सर रुग्णालय या २ रुग्णालयांचा गौरव केला. याआधी महात्मा फुले या आरोग्ययोजनेमध्ये ज्या व्याधी व शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला नव्हता, त्यांचाही समावेश आयुषमान भारत योजनेमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं योजनेची व्याप्ती वाढून ती समाजातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आल.

अॅपचं उद्घाटन 

जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या कार्यक्रमास उपस्थित होत्या. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी आयुषमान भारत योजनेच्या अॅपचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी यांनी ही योजना आरोग्याच्या प्रश्नांवर समग्र विचार करणारी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.हेही वाचा -

आरेतील वृक्षतोड प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

'आरे वृक्षतोड'प्रकरण: अटक झालेल्या 'त्या' पर्यावरणप्रेमींना जामीन मंजूर
Read this story in English
संबंधित विषय