'मरे'च्या विशेष उन्हाळी गाड्या

  Mumbai
  'मरे'च्या विशेष उन्हाळी गाड्या
  मुंबई  -  

  उन्हाळी सुट्टी सुरू झाली की चाकरमानी आपल्या गावी जाणं किंवा फिरायला जाणं पसंत करतात. याचसाठी मध्य रेल्वेने देखील उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने नागपूर, पुणे आणि अमरावती मार्गावर साप्ताहिक वातानुकुलित सुपरफास्ट विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मे पासून शुक्रवारी पुणे ते अजनी, 13 मे पासून दर शनिवारी नागपूर ते अमृतसर आणि 10 मे पासून दर बुधवारी पुणे ते अमरावती या विशेष एक्स्प्रेस 'मरे'ने सुरू केल्या आहेत.

  विशेष गाड्या पुढीलप्रमाणे -

  बुधवार 10 मे - ट्रेन क्र. 22117- पुणे-अमरावती
  गुरुवार 11 मे - ट्रेन क्र. 22118 - अमरावती - पुणे
  शुक्रवार 12 मे - ट्रेन क्र. 22123 - पुणे - अजनी
  शनिवार 13 मे - ट्रेन क्र. - 22125 - नागपूर-अमृतसर
  रविवार 15 मे - ट्रेन क्र. 22126 - अमृतसर - नागपूर
  सोमवार 16 मे - ट्रेन क्र. 22124 - अजनी-पुणे


  हेही वाचा

  उन्हाळी सुट्टीसाठी 'मरे'च्या विशेष गाड्या


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.