Advertisement

एलटीटी ते मडगाव त्रि-साप्ताहिक विशेष १२ गाड्या


एलटीटी ते मडगाव त्रि-साप्ताहिक विशेष १२ गाड्या
SHARES

हिवाळा सुरू झाला की, मुंबईकर एन्जॉयच्या मूडमध्ये असतात. अशा मुंबईकरांचा हा एन्जॉयचा मूड कायम ठेवण्यासाठी मध्य रेल्वेनेही प्रयत्न सुरू केले आहेत. हिवाळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीचा त्रास कमी व्हावा म्हणून लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजेच एलटीटी ते मडगाव दरम्यान १२ त्रि-साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विशेष गाड्या २३ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान विशेष शुल्काासह चालवण्यात येतील.


गाड्यांचं वेळापत्रक 

  • (०१०८५) एलटीटी ते मडगाव ही साप्ताहिक विशेष गाडी २३, २५, २८, ३०, १ जानेवारी आणि ४ जानेवारीला लोकमान्य टिळक टर्मिनसहून सकाळी ५ वाजून ३३ मिनिटांनी सुटणार आहे. ती त्याच दिवशी संध्याकाळी मडगावला ५ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल.
  • (०१०८६) मडगाव ते एलटीटी ही साप्ताहिक विशेष गाडी २४, २६, २९, ३१, २ जानेवारी आणि ५ जानेवारीला मडगावहून सकाळी ५. ३३ वाजता सुटेल. ती त्याच दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचेल.


गाड्यांचे थांबे 

  • ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थीवीम आणि करमाळी

या विशेष गाड्यांना एसी टू टायरचा एक कोच, एसी थ्री टायरचे ११ कोच, सेकण्ड स्लीपर क्लासचे ५ कोच असतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा