Advertisement

रेल्वे कारखान्यात प्रथमच नैसर्गिक गॅसचा वापर


रेल्वे कारखान्यात प्रथमच नैसर्गिक गॅसचा वापर
SHARES

भारतीय रेल्वे प्रगतीपथावर असतानाच भारतीय रेल्वेने आपला वेगळेपण कायम टिकवून ठेवलं आहे. यातच अजून एक पाऊल पुढे टाकत रेल्वे माटुंगा येथील कारखान्यात प्रथमच नैसर्गिक गॅसचा वापर करणार आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक गॅसचा वापर करणारा मध्य रेल्वेचा हा कारखाना हा भारतीय रेल्वेचा देशातील पहिलाच कारखाना ठरला आहे. 

त्यामुळे आता माटुंगा कारखान्यात मेटल कापण्यासाठी नैसर्गिक गॅसचा वापर करण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सागितलं.

या कारखान्यात एलपीजी गॅस बंद केल्यानंतर आता महानगर गॅस लिमिटेड आणि इंडियन रेल्वे ऑर्गनायझेशन फॉर अल्टरनेटीव्ह फ्यूएल यामध्ये महत्वाची भूमिका बजवणार आहे. मध्य रेल्वेवरील या कारखान्यात रेल्वे डब्यांसह अनेक कामे केली जातात. मेटल कापण्यासाठी यापूर्वी एलपीजी गॅसचा वापर करण्यात येत होता. 36 हजार किलो गॅस याकरता वापरण्यात येत होता. हे आता बंद होणार असल्यामुळे माटुंगा वर्कशॉपमध्ये गाड्यांचे डबे, पार्टस बदलणे, रंगरंगोटी आणि देखभालीची सर्व कामेही या कारखान्यात करण्यात येतील असं नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा