Advertisement

लोकलने तोडला सिग्नल! म.रे.ची वाहतूक विस्कळीत

दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद लोकलने घाटकोपरजवळ सिग्नल तोडला. त्यामुळे जलद मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली.

लोकलने तोडला सिग्नल! म.रे.ची वाहतूक विस्कळीत
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलने सिग्नल तोडल्याने घाटकोपर जवळ वाहतुकीचा खोळंबा झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. तरी जलद मार्गावरील वाहतूक संध्याकाळपर्यंत सुरळीत होऊ शकली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद लोकलने घाटकोपरजवळ सिग्नल तोडला. त्यामुळे जलद मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली.

लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना अक्षरश: ट्रॅकवर उतरून पायपीट करावी लागली. संध्याकाळपर्यंत डाऊन मार्गाची वाहतूक सुरळीत झाली असली, तरी अप मार्गावरील वाहतूक विस्कळीतच होती.

त्यामुळे शनिवारी सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची चांगलीच अडचण झाली.



हेही वाचा-

फुकट्यांना मध्य रेल्वेचा दणका, १५३ कोटींचा दंड वसूल

पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! 'ही' ३ स्थानकं होणार अपग्रेड!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा