Advertisement

मध्य रेल्वेचा पायाभूत सुविधांवर अधिक भर

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या फायद्यासाठी अनेक प्रमुख स्थानकांचा विकस करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

मध्य रेल्वेचा पायाभूत सुविधांवर अधिक भर
SHARES

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या अभियांत्रिकी विभागाने (CR) मे महिन्यात प्रवाशांना उत्तम प्रवास अनुभव देण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा, सुरक्षा सुधारणा आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

“मध्य रेल्वेने प्रवाशांच्या फायद्यासाठी अनेक प्रमुख स्थानकांचा  विकस करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे विविध महत्त्वाच्या स्थानकांवर रोड ओव्हर ब्रिज (ROB) आणि फूट ओव्हर ब्रिज (FOBs) बांधणे या कामांचा समावेश आहे.  

तसेच ठाण्यात, कल्याणच्या टोकावरील FOB वर मोठे दुरुस्तीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले, ज्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 9/10 च्या FOB पायऱ्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत, ”सीआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वेगवेगळ्या स्थानकांवर नूतनीकरणाचे काम

कल्याण स्थानकावरील जुन्या FOB वर, फलाट क्रमांक 6/7 कडे जाणाऱ्या जिन्यांसह मोठी दुरुस्ती करण्यात आली.  तुटलेल्या पायऱ्यांच्या फरशा आणि गळती छप्पर पत्रे यासारख्या समस्यांचे निराकरण केले. नूतनीकरण केलेला पूल आणि जिना आता सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले आहेत, त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि सोयी वाढल्या आहेत, असे ते म्हणाले.

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने नेरळ स्थानकावर तीन पायऱ्यांसह 6 मीटर रुंद FOB बांधूनही योगदान दिले. पूर्वेकडील बाजूस प्रवेश देणारा नवीन पूल १ मे रोजी प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.

“एकट्या मे महिन्यात, विभागाने रेल्वे नेटवर्कची विश्वासार्हता आणि सुरक्षितता सुनिश्चित करून 583 किमी रेल्वे आणि 127 किलोमीटर वेल्डची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या महिन्यात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, सुरक्षा उपायांना बळकट करणे आणि सीआर नेटवर्कवर विविध प्रवासी सुविधा वाढवणे यावर अधिक भर देण्यात आला आहे. हेही वाचा

माथेरानची टॉय ट्रेन रुळावरून घसरली

AC लोकल झाली Non-AC, दरवाजे उघडे ठेवूनच ट्रेन पळवली

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा