स्वच्छ भारत मोहिमेमध्ये मध्य रेल्वेने अनोखे योगदान दिले आहे. सार्वजनिक शौचालयात जेथे वेस्टर्न कमोड सीट आहेत, बहुतेक लोक त्याचा वापर करण्यापूर्वी सीट कव्हर उचलत नाहीत, ज्यामुळे इतर लोकांच्या वापरण्यायोग्य ते राहत नाही.
पण रजनीश कुमार गोयल, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, या समस्येवर मात करण्यासाठी ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’ ही संकल्पना तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
बरेचदा प्रवासी नेहमी कमोडचं वरील झाकण न काढताच त्यावर लघुशंका उरकत असतात, त्यामुळे त्या झाकणावर शिंतोंडे उडून त्याची दुर्गधी पसरत राहते. तसेच त्यानंतर जाणारे प्रवासी स्वच्छ नसल्याचे पाहून कमोडच्या झाकणाला हात लावत नाहीत.
मध्य रेल्वेच्या मुंबई डीव्हीजनने कमोडच्या तोडावरील झाकणालाच स्प्रिंग बसविल्याने, हे झाकण सतत उघड्या स्थितीत राहते. यामुळे या जागेवर कुणी बसत नाही. हे झाकण उघडेच राहत असल्याने झाकण न उघडताच त्यावर लघुशंका करणाऱ्यांवर अटकाव होणार आहे.
विदेशी पद्धतीच्या कमोड कव्हर बसविण्याचा एक अनोखा उपक्रम मध्य रेल्वेने आखला आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय सीएसएमटी (CSMT) स्थानकात राबवला जाणार आहे, यामुळे सार्वजनिक स्वच्छता गृहात स्वच्छता राखण्यास रेल्वेला मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांना देखील दुर्गंधीपासून मुक्ती मिळणार आहे.
हेही वाचा