Advertisement

'या' तारखेपासून सीएसएमटी ते कल्याण १० एसी लोकल धावणार

प्रवाशांसाठी सीएसएमटी ते कल्याण दरम्यान एसी लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावास रेल्वे बोर्डानं मान्यता दिली आहे.

'या' तारखेपासून सीएसएमटी ते कल्याण १० एसी लोकल धावणार
(Representational Image)
SHARES

प्रवाशांसाठी सीएसएमटी ते कल्याण दरम्यान एसी लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावास रेल्वे बोर्डानं मान्यता दिली आहे. मध्य रेल्वेनं (CR) १७ डिसेंबर २०२० पासून या मार्गावरील सध्याच्या सेवांच्या जागी १० एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीआरनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पहिली ट्रेन कुर्ला-सीएसएमटी दरम्यान पहाटे ५.४२ वाजता धावेल. तर सीएसएमटी-कुर्ला दरम्यान मुख्य मार्गावरील शेवटची ट्रेन २३.५३ वाजता धावेल.

मध्य रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, वरील सेवा केवळ सोमवारी ते शनिवारी एसी रेकद्वारे चालवल्या जातील आणि सर्व स्थानकांवर थांबतील. रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनानं परवानगी दिलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे.

प्रवाशांना covid 19च्या सर्व नियमांचं, एसओपीचं पालन करण्यास सांगितलं आहे. शिवाय, वर्तमानकाळातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात साथीचा रोग लक्षात घेता काही निर्बंध घातले गेले आहेत.

तसंच, रेल्वे बोर्डानं सीएसएमटी ते कल्याण दरम्यानच्या मुख्य मार्गावर एसी लोकल ईएमयू गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यास परवानगी दिली. या काळात लोकांच्या प्रतिसादाचं मूल्यांकन करण्यासाठी दहा एसी लोकल चालवल्या जातील.

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ते १० एसी लोकल ट्रेन सेवा चालवतील, त्यापैकी किमान दोन सेवा सकाळ आणि संध्याकाळच्या दरम्यान चालवल्या जातील.



हेही वाचा

ठाकरे सरकारला उच्च न्यायालयाचा दणका, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश

नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून सर्वांसाठी लोकल ट्रेन?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा