Advertisement

नवरात्रोत्सवात ठाणे, कल्याणमध्ये वाहतुकीत बदल

ठाणे शहरातील टेंभीनाका आणि कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथील मार्गात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवात ठाणे, कल्याणमध्ये वाहतुकीत बदल
SHARES

नवरात्रोत्सव काळात ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक बदल लागू केले आहेत. यानुसार ठाणे शहरातील टेंभीनाका आणि कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथील मार्गात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. १७ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत हे बदल लागू राहणार आहेत.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सणांमध्ये मिरवणुकांना बंदी आहे. मात्र, एखाद्या मंडळाने मिरवणूक काढली तर शहरातील वाहतूक कोलमडू शकते. टेंभीनाका चौकातील रस्त्यावर आणि कल्याण येथील दुर्गाडी किल्यावरही नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यामुळे या दोन्ही भागांतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या मार्गांवरही वाहतूक बदल लागू केले आहेत.

असे केले बदल

  •  गडकरी चौकातून टॉवरनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वसंत हॉटेल येथे प्रवेशबंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहने गडकरी चौक येथून दगडीशाळामार्गे सोडण्यात येणार आहेत.
  •  चरई येथून भवानी चौक, टेंभीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना धोबीआळी येथे प्रवेशबंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने डॉ. सोनुमिया रोड, धोबीआळी मशीद येथून सोडण्यात येणार आहेत.
  • टेंभीनाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातून जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना टॉवरनाका येथे प्रवेश बंद केला आहे. या मार्गावरील वाहने टॉवरनाका येथून गडकरी चौक, अल्मेडा चौक मार्गे सोडण्यात येतील.   
  •  मिनाताई ठाकरे चौकातून ठाणे रेल्वे स्थानक परिसरात जाणाऱ्या वाहनांना जिल्हा रुग्णालय परिसरात प्रवेशबंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने कोर्टनाका येथून जांभळीनाका मार्गे रेल्वे स्थानकाच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत.
  •  कोर्टनाका येथून टेंभीनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.
  •  कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळील रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी लालचौकी ते दुर्गामाता चौकमार्गे भिवंडीत जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना लालचौकी येथे प्रवेशबंद असणार आहे. या मार्गावरील वाहने लाल चौकीकडून आधारवाडी चौक, गांधारी मार्गे सोडण्यात येणार आहेत.
  •  भिवंडी येथून लालचौकीच्या दिशेने येणारी जड-अवजड वाहने दुर्गामाता चौकाकडून डावीकडे वळण घेऊन वाडेघर चौक, आधारवाडी चौक येथून जातील.
  •  पत्रीपूल येथून गोविंदवाडी बाह््यवळण मार्गावरून दुर्गाडी चौकाकडे तसेच दुर्गाडी चौकाकडून पत्रीपुलाकडे येणारी हलकी वाहनांना सायंकाळी ४ नंतर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने आग्रा रोड, पत्रीपूल, शिवाजी चौक, लालचौकी मार्गे जातील. तसेच दुर्गाडी येथून लालचौकी, शिवाजी चौक, वलीपीर येथून जातील.

हेही वाचा -

मुंबईत एका दिवसात विक्रमी १६,७०० चाचण्या

आता अल्प दरात उपलब्ध होणार रेमडिसेव्हिरRead this story in English
संबंधित विषय
POLL

आजच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स किती धावांचा डोंगर रचेल, असे वाटते ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा