Advertisement

मुंबई विमानतळ अखेर ‘अदानी एअरपोर्टस’कडे

हे विमानतळ'अदानी एअरपोर्टस'कडे सोपविण्यास केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) मंजुरी दिली आहे. या विमानतळात भारतीय विमानतळ प्राधिकरणाची २६ टक्के भागीदारी आहे.

मुंबई विमानतळ अखेर ‘अदानी एअरपोर्टस’कडे
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अखेर ‘अदानी एअरपोर्टस’कडे आली आहे. हे विमानतळ'अदानी एअरपोर्टस'कडे सोपविण्यास केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) मंजुरी दिली आहे. या विमानतळात भारतीय विमानतळ प्राधिकरणाची २६ टक्के भागीदारी आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी याआधी जीव्हीके, एएआयसह अन्य दोन भागीदारांच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) या कंपनीकडे होते. यामध्ये जीव्हीकेची भागीदारी सर्वाधिक होती. मात्र, जीव्हीके समूह आर्थिक संकटात सापडला आहे.याशिवाय दोन महत्त्वाच्या भागीदारांनीही जीव्हीके समूहापासून फारकत घेतली. मागी लवर्षी या विमानतळाच्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यापासून जीव्हीकेला हे विमानतळ अदानी समूहाला विक्री करावे लागले.

अदानी एअरपोर्ट्सने विमानतळातील जीव्हीकेचा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी केलेला आहे. त्यानंतरही जीव्हीके समूहाच्या विमानतळ उपकंपनीच्या डोक्यावर ३,७३९ कोटी रुपयांचे कर्ज असेल. तर मिआलच्या डोक्यावर ८,१०९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे दोन्ही कर्ज मिळून त्यातील ९५ टक्के रक्कमेचा भरणा अदानी एअरपोर्ट्स करणार आहे. त्याद्वारे या विमानतळाची ७४ टक्के भागीदारी 'अदानी'कडे येईल. तर उर्वरित २६ टक्क्यांमध्ये एएआयची हिस्सेदारी कायम असेल.



हेही वाचा -

सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 'या' कंपन्या इच्छुक

वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणार कॅमेरे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा