Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून रेल्वे कामांच्या सुविधांचे लोकार्पण


मुख्यमंत्र्यांकडून रेल्वे कामांच्या सुविधांचे लोकार्पण
SHARES

प्रजासत्ताक दिनाचं अौचित्य साधत शुक्रवारी मध्य अाणि पश्चिम रेल्वेच्या विविध कामांचं अाणि सुविधांचं लोकार्पण करण्यात अालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-उद्घाटन करून दोन्ही रेल्वेमार्गावरील सुविधांना हिरवा झेंडा दाखवला. लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, नेरळ, टिळकनगर, सांताक्रूझ येथील फूटअोव्हर ब्रिज तसेच विद्याविहार, एलफिन्स्टन रोड येथील फूटअोव्हर ब्रिजची अतिरिक्त जागा, बोरीवली, लोअर परेल येथे एक्स्टेन्शन फूटअोव्हर ब्रिजतं उद्घाटन यावेळी करण्यात अालं. त्याचबरोबर ठाणे अाणि दादर इथं सरकते जिने तसंच दादर, रे रोड, मानखुर्द, बोरीवली या स्थानकांवर लिफ्ट बसविण्याच्या सुविधेचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यानी केलं. त्याचबरोबर विरार कारशेड, ग्रँट रोड, माहिम, लोअर परेल इथं सौरउर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामालाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला.गोवंडी, टिटवाळ्यात वन रूपी क्लिनिकचं उद्घाटन

गोवंडी अाणि टिटवाळा स्थानकांत वन रूपी क्लिनिकचं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. किंग्स सर्कल येथील कार्यालयाचं तसंच मध्य रेल्वेच्या ५२ रेल्वे स्थानकांवर एलईडी लाइट्स, वडाळा अाणि बदलापूरमध्ये वायफाय सुविधा या सर्वांचं उद्घाटन करण्यात अालं. विशेष म्हणजे, गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला. शुक्रवारपासून मिनीट्रेनची सेवा सुरू झाली अाहे.


रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेसाठी खूप चांगलं काम आहे. यापुढे लष्कराला रेल्वेचं काम करण्याची गरज भासणार नाही. लष्करानं दोन-अडीच महिन्यात अापली जबाबदारी पूर्ण केली आहे. रेल्वेनं गेल्या ३ वर्षात प्रवाशांच्या दृष्टीनं चांगल्या सुविधा राबवण्यात अाल्या आहेत. येत्या काही महिन्यांत रेल्वेत आणखी बदल आणि स्वच्छ स्टेशन्स प्रवाशांना पाहायला मिळतील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


दोन्ही मार्गावर एलिव्हेटेड काॅरिडोर

मध्य आणि पश्चिम रेल्वे अशा दोन्ही मार्गावर एलिव्हेटेड कॉरिडोर बसवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान हा कॉरिडोर असेल. याचा फायदा ३൦ ते ४൦ लाख प्रवाशांना होणार आहेे.


हेही वाचा - 

'इसिस'च्या टार्गेटवर रेल्वे, कुठलंही हत्यार न वापरता घातपात घडवण्याची योजना

हार्बरवर बम्बार्डिअर लोकलला नकार, रेल्वे कर्मचाऱ्यांचा विरोध


संबंधित विषय