Advertisement

हार्बरवर बम्बार्डिअर लोकलला नकार, रेल्वे कर्मचाऱ्यांचा विरोध

मध्य रेल्वेवर नव्याने ४ बम्बार्डिअर लोकल दाखल झाल्या आहेत. अशीच एक तरी लोकल हार्बरवर देखील चालवावी, असा प्रस्ताव विभागीय कार्यालयाचा होता. पण, रेल्वेच्याच कर्मचाऱ्यांनी या लोकलला नकार देत विरोध दर्शवला आहे.

हार्बरवर बम्बार्डिअर लोकलला नकार, रेल्वे कर्मचाऱ्यांचा विरोध
SHARES

मध्य रेल्वेवर नव्याने ४ बम्बार्डिअर लोकल दाखल झाल्या आहेत. अशीच एक तरी लोकल हार्बरवर देखील चालवावी, असा प्रस्ताव विभागीय कार्यालयाचा होता. पण, रेल्वेच्याच कर्मचाऱ्यांनी या लोकलला नकार देत विरोध दर्शवला आहे.


हार्बरवर बम्बार्डिअरला विरोध का?

हार्बरवर बम्बार्डिअरच्या काही फेऱ्या सुरू करण्याचा मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन यांचा प्रयत्न होता. पण, त्याला रेल्वेच्या क्रू मेंबर्सनी विरोध केला आहे. बम्बार्डिअरचे तंत्र वेगळे असून त्यासाठी मोटरमनला प्रशिक्षण द्यावे लागेल. तसंच मध्य रेल्वेच्या गाड्यांचा कुर्ला कारशेड तर हार्बरच्या गाड्यांचा सानपाडा कारशेडमध्ये मेंटेनन्स होतो. परिणामी, बम्बार्डिअर आल्याने गाड्यांची एकसमानता नष्ट होऊन मेंटेनन्स शेड्युुल बिघडेल, असं कारण क्रू मेंबर्सकडून दिलं जात आहे.


हार्बरवर कायमच जुना लॉट!

मध्य रेल्वेवर प्रवाशांसाठी नव्या आधुनिक बम्बार्डिअरलोकलचा समावेश करण्यात आला. पण, मध्य रेल्वेवर नवीन लोकल दाखल झाल्यानंतर जुन्या लोकल हार्बर मार्गावर चालवण्यात येतात. मध्य रेल्वेच्या ताफ्यात पश्चिम रेल्वेकडून ११ तर बोर्डाकडून १३ बम्बार्डिअर अशा एकूण २४ गाड्या येणार आहेत. हार्बर मार्गावर सद्यस्थितीत सर्वात जुन्या लोकल चालवल्या जात आहेत. हार्बरकडे ३८ लोकल असून ट्रान्सहार्बर मार्गावर ११ लोकल चालवल्या जात आहेत. त्यात भेल तसंच डीसी टू एसी रेट्रोफिटेड गाड्यांचा भरणा आहे.


उंचीमुळे हार्बरचा तोटा!

मध्य रेल्वेत सुरुवातीला नव्या बम्बार्डिअर गाड्यांच्या जादा उंचीची अडचण आल्याने त्यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे नव्या गाड्या पश्चिम रेल्वेला मिळाल्या आणि जुन्या सिमेन्स गाड्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या. या सिमेन्स गाड्यांमध्ये गरम हवा बाहेर फेकणारे ब्लोअर्स बंद अवस्थेत असल्याने पिकअवरमध्ये प्रवासी घामाघूम होतात.


संबंधित विषय
Advertisement