Advertisement

मध्य रेल्वेवर गुरुवारपासून धावणार चौथी बम्बार्डिअर


मध्य रेल्वेवर गुरुवारपासून धावणार चौथी बम्बार्डिअर
SHARES

मध्य रेल्वेवर गुरुवारपासून चौथी बम्बार्डिअर धावणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर बम्बार्डिअर लोकलच्या एकूण ४५ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या बम्बार्डिअर लोकलच्या ११ फेऱ्या मध्य रेल्वेवर चालवल्या जाणार आहेत.


चौथ्या बम्बार्डिअर लोकलच्या फेऱ्या पुढीलप्रमाणे

पहिली फेरी विद्याविहारहून सकाळी ५.२७ वाजता सुटेल. दुसरी फेरी बदलापूरहून सकाळी ६.५५ वाजता तर तिसरी फेरी सीएसटीएमहून सकाळी ८.२० वाजता सुटेल. चौथी फेरी डोंबिवलीहून सकाळी ९.४८ वाजता तर पाचवी फेरी दादरहून सकाळी ११.५२ वाजता सुटेल. सहावी फेरी कल्याणहून दुपारी १२.४० वाजता तर सातवी फेरी सीएसएमटीहून दुपारी २.२५ वाजता सुटेल. आठवी फेरी कसाराहून सायंकाळी ५.१७ वाजता, नववी फेरी सीएसएमटीहून रात्री ७.४२ वाजता,  दहावी फेरी अंबरनाथहून रात्री ९.१५ वाजता, अाणि शेवटची अकरावी फेरी सीएसएमटीहून रात्री ११.०४ वाजता सुटून ठाण्याला रात्री १२ वाजता पोहोचेल. बम्बार्डिअर लोकल आता सीएसटीएम ते कसारा धावणार आहे.


चौथ्या बम्बार्डिअरच्या ११ फेऱ्या चालवणार

१८ डिसेंबर रोजी पहिली बम्बार्डिअर लोकल मध्य रेल्वेवर धावली, त्या दिवशी तिच्या १२ फेऱ्या झाल्या होत्या. २६ डिसेंबरला दुसरी बम्बार्डिअर मध्य रेल्वेला मिळाली, त्या दिवशी ९ फेऱ्या तर ६ जानेवारीला मिळालेल्या तिसऱ्या बम्बार्डिअरच्या १३ फेऱ्या झाल्या होत्या. गुरुवारी चौथ्या बम्बार्डिअरच्या ११ फेऱ्या चालवल्या जाणार अाहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा