Advertisement

'ट्विन टनेल' सोडवणार मुंबईतील वाहतूक कोंडी

मुख्यमंत्र्यांकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट

'ट्विन टनेल' सोडवणार मुंबईतील वाहतूक कोंडी
SHARES

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच 'ट्विन टनेल' उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नीति आयोगाच्या मदतीनं मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं येत्या डिसेंबरमध्ये मुंबई विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडण्यात येईल, अस मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.  

मुंबई आणि एमएमआरमध्ये 1 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीनं मुंबईचा विकास करण्यासाठी नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली.  त्याशिवाय मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केल्याने अनेक विकास कामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळालेय. 2024 पर्यंत त्यातले अनेक प्रकल्प पूर्ण होतील.

मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे मिसिंग लिंक तसेच कोस्टल रोड अशी उदाहरणे दिली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत आणखी सात विकास केंद्रे लवकरच उभी राहतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत सुरू झाल्यास त्याचा राज्यातील नागरिकांबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे.

पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.



हेही वाचा

वर्सोवा-विरार सी लिंक जपानच्या मदतीने पूर्ण होणार

मुंबई मेट्रो 2 बी मार्गावर गर्डरचे यशस्वी बांधकाम

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा