Advertisement

'त्या' मार्गावर होणार कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या कामांना गती दिली जात आहे.

'त्या' मार्गावर होणार कुलाबा-सीप्झ मेट्रोची चाचणी
SHARES

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या कामांना गती दिली जात आहे. त्यानुसार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुलाबा ते सीप्झ या भुयारी मेट्रो रेल्वे मार्गावर नवीन मेट्रो डब्यांची चाचणी मरोळ-मरोशी इथं करण्यात येणार आहे. राज्य सरकारनं स्थगिती दिलेल्या आरेतील त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी होणार असून, आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.

सध्या मरोळ-मरोशी इथं भुयारी मार्गाचं काम सुरू असून, त्याच्याजवळच रॅम्प बनवून चाचणी मार्गिकेचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकही झाड तोडण्यात येणार नाही. कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाइन-३ चं काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीनं श्रीसिटी आंध्रप्रदेश इथं ८ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची कारखान्यातील तांत्रिक चाचणी झालेली आहे.

चाचणीच्या मार्गावर मेट्रोच्या डब्यांची १० हजार किमींची चाचणी यशस्वी झाली की मग त्यानंतर संपूर्ण कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवर ट्रेनची चाचणी घेतली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पद्धतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर धावण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचं समजतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा