SHARE

मस्जिद - मस्जिद स्टेशनवर असणाऱ्या तिकीट खिडकी बाबत प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पाच खिडक्याचे तिकीट घर असून सुद्धा गर्दीच्या वेळेत जादा खिडकी उपलब्ध होत नसल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. स्टेशनवरील इलेक्ट्रीक सीव्हीएम मशीन सुद्धा दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना तासनतास लाईनमध्ये उभं राहावं लागत आहे. याबाबत प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक प्रभाकर कोंबेकर यांना विचारलं असता त्यांनी सांगितले, की जादा खिडकी नसल्यानं प्रवाशांना नेहमी त्रास होतो. तर याबाबत स्टेशन मास्तरांकडे तक्रार करुनही ते हस्तक्षेप करत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या