Advertisement

दादर स्टेशनचा 'हा' जिना तोडल्यामुळे प्रवासी त्रस्त


दादर स्टेशनचा 'हा' जिना तोडल्यामुळे प्रवासी त्रस्त
SHARES

मुंबईच्या मुख्य रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या दादर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. प्रचंड गर्दी असलेल्या या स्टेशनवर अनेक जिने आहेत. जिन्यांची संख्या जरी जास्त असली तरी या ठिकाणी रोज प्रवास करणारे प्रवासी असंख्य आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून दादरच्या ६ नंबर प्लॅटफॉर्मचा जिना दुरुस्तीकरीता तोडल्यामुळे प्रवाशांचे रोज हाल होत आहेत.



ट्रेन आल्यानंतर जिन्यातून वर चढून पब्लिक ब्रिज गाठण्यासाठी प्रत्येक प्रवासी धावत असतो. परंतु अत्यंत गर्दीच्या आणि गरजेच्या असणाऱ्या या जिन्याचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

२९ सप्टेंबर रोजी एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती दादर स्थानकात कधीही होऊ शकते, अशी शक्यता असतानाही रेल्वे प्रशासन या पूल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या ब्रिजचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ब्रिज दुरुस्तीचे काम कधी पूर्ण होणार हे कुणालाच सांगता येत नाही. गतवर्षीच्या गणेशोत्सवापासून यंदाच्या गणेशोत्सवापर्यंत फुल मार्केटमधला पब्लिक ब्रिज बंद असल्यामुळे प्रवासी त्रस्त होते. तो ब्रिज दुरुस्त होताच या ब्रिजचे काम सुरू झाल्यामुळे दादर रेल्वे स्थानकात दरवर्षी एका ब्रिजच्या दुरुस्तीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

फुल मार्केटपासून हिंदमाताकडे जाणारा पब्लिक ब्रिजसुद्धा खूप वर्षे जुना असल्यामुळे ट्रेन जात असताना हा ब्रिज हालतो. त्यातच या जिन्याचे कामकाज सुरू असल्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत.


ब्रिजचे काम सुरू आहे. पण ते पूर्ण कधी होणार हे निश्चित सांगता येणार नाही. आता त्या ठिकाणी नव्याने एक वेगळा ब्रिज तयार करण्याची योजना असून या विषयी अधिक माहिती आमचे वरिष्ठच देऊ शकतील
- प्रवीण शेळके, व्यवस्थापक , दादर स्टेशन


वर्षभर फुल मार्केट मधल्या ब्रिजमुळे आम्ही त्रस्त होतो. तो ब्रिज सुरू होताच या ब्रिजचे काम सुरू झाले. त्यामुळे दादरला येणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत रेल्वे प्रशासनाची दिरंगाईमुळे आम्हाला रोज पुन्हा उलट चालत जाऊन दुसऱ्या ब्रिजचा वापर करावा लागतो. ऑफिसला जाता-येताना अर्ध्याहून अधिक वेळ हे जिने चढण्यात आणि उतरण्यात जातो.
- केतकी पाटील, प्रवासी


पुन्हा एकदा मुंबईत कुठेही एल्फिन्स्टनसारखी घटना होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. प्रशासनाने ब्रिजचे काम काढले आहे, तर तो ब्रिज मजबूत बांधवा. आता मुंबईकरांवर चेंगराचेंगरीत मरण्याची वेळ येऊ नये. सध्या ब्रिजचे सुरू असलेले काम वर्षभर न लावता गर्दी आणि प्रवाशांचा विचार करून जलद गतीने पूर्ण करावे.
- जगदीश ठाकूर, प्रवासी


हेही वाचा - 

म्हणून, एल्फिन्स्टन पुलावर 22 जणांचा बळी गेला


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा