Advertisement

कोरोनामुळं एसटीच्या वाहतूक सेवेवर परिणाम


कोरोनामुळं एसटीच्या वाहतूक सेवेवर परिणाम
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं असून, या लॉकडाऊनच्या काळात एसटी महामंडळाच्या एसटीनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाला वाहतूकीची सेवा दिली. मात्र, सध्या कोरोनानं एसटी महामंडळातील अनेक कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात जावे लागत असल्यानं आणि कोरोनाच्या धास्तीने गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळं सध्या मुंबई महानगरात एसटी सेवा पुरविण्यात मर्यादा येत आहेत.

फेऱ्या कमी झाल्यानं या भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. मंगळवारी मुंबई विभागातील ५ आगारांमध्ये मिळूण ७५ ते ८० टक्के फेऱ्याही होऊ शकल्या नाहीत. मुंबई विभागातील एकूण ७६ बाधितांमध्ये कुर्ला नेहरू नगर, मुंबई सेंट्रल व परळ आगारातील कर्मचारी अधिक आहेत.

मागील महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून एसटी महामंडळात मोठ्या संख्येनं कोरोनाबाधित कर्मचारी आढळू लागले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याच्या धास्तीने काही कर्मचारी गैरहजर राहिले. एसटीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरू  नगर, परळ, उरण, पनवेल या मुंबई विभागाच्या आगारातच करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ७६ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये कुर्ला नेहरू  नगर आगारातीलच साधारण ५० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण असल्याचे सांगितले जाते. तर परळ व मुंबई सेंट्रल आगारात प्रत्येकी १० कर्मचारी आहेत. पनवेल व उरण आगारातील कर्मचारी बाधित आहेत.

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याने अनेकांना विलगीकरणात जावे लागले आहे. त्याचा परिणाम एसटीच्या मुंबई परिसरातील वाहतुकीवर होत आहे. सध्या अत्यावश्यक सेवेबरोबरच खासगी सेवेतील कर्मचारीही एसटीवर अवलंबून आहेत. परंतु कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा एसटीच्या वाहतुकीवर होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई विभागातील ५ आगारांत मिळून साधारण २०० पेक्षा जास्त फेऱ्या होतात. मंगळवारी फक्त ५४ फेऱ्याच झाल्याची माहिती समोर येत आहे. १,१०० प्रवाशांनीच दिवसभरात प्रवास केला. त्याचप्रमाणं एसटी वेळेत मिळत नसल्याने अनेकजण रिक्षा, खासगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत.



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा