Advertisement

मध्य रेल्वेवर १ जूनपासून दररोज विशेष गाड्या धावणार


मध्य रेल्वेवर १ जूनपासून दररोज विशेष गाड्या धावणार
SHARES

मध्य रेल्वेच्या खालील विशेष गाड्या १ पासून चालविण्यात येतील. १ मे पासून चालविण्यात येणा-या श्रमिक विशेष ट्रेन आणि २२ मे २०२० पासून विशेष वातानुकूलित गाड्या चालविण्याव्यतिरिक्त सदर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.

1. 01015/01016 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर विशेष 

01015 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल.

01016 गोरखपूर येथून ३.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल.

2. 01019/01020 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - भुवनेश्वर विशेष 

01019 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

01020 भुवनेश्वर येथून ३.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल

3. 01061/01062 लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा विशेष 

01061 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १.६.२०२० पासून दररोज चालविण्यात येईल.

01062 दरभंगा येथून ३.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल.

4. 01071/01072 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष 

01071 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल.

01072 वाराणसी येथून ३.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल.

5. 01093/01094 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी विशेष 

01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

01094 वाराणसी येथून २.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

6. 01139/01140 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग विशेष 

01139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

01140 गदग येथून २.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

7. 01301/01302 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बेंगलुरू विशेष 

01301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

01302  बेंगलुरू येथून २.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

8. 02141/02142 लोकमान्य टिळक टर्मिनस - पाटलीपुत्र जं. विशेष 

02141 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १.६.२०२० पासून दररोज चालविण्यात येईल. 

02142 पाटलीपुत्र जं. येथून २.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

9. 02149/02150 पुणे - दानापूर विशेष 

02149 पुणे येथून १.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

02150 दानापूर येथून ३.६.२०२० पासून दररोज  चालविण्यात येईल. 

या सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच आयआरसीटीसी वेबसाइट www.irctc.co.in व मोबाइल अ‍ॅपद्वारे जास्तीत जास्त ३० दिवसांच्या एआरपी (आगाऊ आरक्षण कालावधी) नुसार ऑनलाईन सुरू आहे.

 कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत.  ‘एजंट’, (आयआरसीटीसी एजंट आणि रेल्वे एजंट दोघे) यांच्यामार्फत तिकिट बुक करण्यास परवानगी नाही.

या वातानुकूलित आणि  बिगर वातानुकूलित दोन्ही वर्ग असलेल्या विशेष गाड्या पूर्णपणे राखीव गाड्या असतील.  सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस) डब्ब्यातही बसण्यासाठी राखीव जागा असेल.  भाडे सामान्य असेल आणि सामान्य द्वितीय श्रेणी (जीएस)  डब्ब्यांसाठी राखीव असल्यास, द्वितीय आसन (2 एस) श्रेणीचे  भाडे आकारले जाईल आणि सर्व प्रवाशांना जागा देण्यात येईल.

अस्तित्त्वात असलेल्या नियमांनुसार आरएसी आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल परंतु प्रतिक्षा यादीतील तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.

प्रवाशांना सामान्य सूचना

  • सर्व प्रवाशांची अनिवार्यपणे तपासणी करण्यात येईल आणि केवळ लक्षणं नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश करण्यास / बसण्यास परवानगी आहे.
  • केवळ पुष्टीकृत (confirmed) तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल.  
  • सर्व प्रवाशांनी प्रवेशावेळी आणि प्रवासादरम्यान चेहरा कव्हर / मुखपट्टी घातले असले पाहिजेत.  
  • स्टेशनवर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवासी कमीतकमी ९० मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचेल.  
  • प्रवाशांनी स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये सामाजिक अंतर ठेवले पाहिजे.  
  • त्यांच्या गंतव्यस्थानावर आगमन झाल्यानंतर,  प्रवाश्यांना गंतव्य राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा