Advertisement

बेस्टच्या २३ महिला कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात


बेस्टच्या २३ महिला कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात
SHARES

मुंबईकरांसह कोरोनानं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ही टार्गेट केलं होतं. परंतु, बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे बेस्टमधील २३ महिला कर्मचारी कोरोनामुक्त झाल्या आहेत. बेस्टमधील १,८५० करोनाबाधित कर्मचारी उपचारानंतर बरे झाले आहेत.

१२० कर्मचारी मुंबई व परिसरातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय २७ कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाल्याची माहिती बेस्ट उपक्र माने दिली. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमध्ये २३ महिलांचाही समावेश होता. परंतु या महिला पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. बेस्टच्या वाहतूक विभागातील १० महिलांचा यात समावेश आहे. 

यामध्ये वाहतूक पर्यवेक्षिका, वाहक यांचा समावेश आहे. तसेच वीज विभागातील आठ, अभियंता विभागातील एक आणि अन्य विभागातील ४ महिलांचा समावेश आहे.

दरम्यान, प्रवासी संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने बेस्टचा प्रवास अधिक जीवघेणा ठरू लागला आहे. इतर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने बहुतांश प्रवाशांना बेस्टवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी जागा मिळविण्याची धडपड करताना अंतरनियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा