Advertisement

टॅक्सी/रिक्षा चालकांचा वाली कोण?


SHARES

चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनानं मुंबईत चांगलाच धुमाकुळ घातला. दररोज हजाराच्या संख्येत रुग्णांना कोरोनाची लागण होत होती. त्यामुळं संपुर्ण मुंबईच बंद पडली होती. मुंबई बंद झाल्यानं सर्व व्यवसाय, दुकानं यांच शटर डाऊन झालं. हातावर पोट असलेल्यांना घरी बसण्याची वेळ आली. अशा परिस्थिती जगायचं कसं असा प्रश्न मुंबईतील अनेकांना पडला. याथील महत्वाचा कामागार वर्ग म्हणजे मुंबईचा कणा असलेली रिक्षा-टॅक्सीची वाहतूक सेवा. 

लोकल ट्रेन मुंबईची लाईफलाइन असेल तर, टॅक्सी-रिक्षा मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु लॉकडाऊनचं संकट आणि सरकारी उदासीनतेमुळं हा कणा मोडकळीला आला आहे. मागील ३ महिन्यांपासून ठप्प झालेला व्यवसाय, नियमांच्या नावाखाली पोलिसांकडून होणारी दंडेलशाही आणि शून्य सरकारी मदत यामुळं हातावर पोट असणारे टॅक्सी/रिक्षा चालक मेटाकुटीला आले आहेत. 

लॉकडाऊनमुळं रिक्षा-टॅक्सी चालकांवर आर्थिक संकट ओढावलं. उरली-सुरली सर्व बचत संपल्यानं आता खायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. सरकारच्या नियमानुसार सेवा देणं, दिवस-रात्र मेहनत करणं. यावर यांच पोट अवलंबून आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकार काही तरी मदत करेल अशी आशा या चालक-मालकांना होती. परंतु, ती सुद्धा धुळीला मिळाली. सरकारसह एकाही स्थानिक नेत्यानं आमच्या समस्येकडं पाहिलं नाही, असा आरोप रिक्षा-टॅक्सी चालक करत आहेत. 

सध्या अॅपवर आधारित असलेल्या ओला-उबर टॅक्सी सेवेकडं सरकार लक्ष देत आहे. पण गेले अनेक वर्ष रिक्षा-टॅक्सी चालक व मालक वाहतूक सेवा देतोय. मुंबईकरांच्या हाकेला हाक देत मदतीचा हात पुढे करतोय मग त्यांना पहिली मदत का नाही मिळत असा सवालही या चालक-मालकांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात रिक्षा-टॅक्सी मेन्स युनियनचे प्रमुख शशांक राव यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी, लॉकडाऊनमुळं रिक्ष-टॅक्सी व्यवसाय पुर्णपणे बंद आहे. मागील ३ महिन्यात या चालक-मालकांना एका रुपयाचं उत्पन्न नाही. सरकारकडून कुठलीही मदत नाही. सातत्यानं सरकारसह पाठपुरवठा करत आहोत. त्याशिवाय, आम्ही रिक्षा-टॅक्सी चालक व मालकांना दरमहा १० हजार रुपयाची मदत करण्याचं सरकारला निवेदन दिलं होतं. रिक्षा-टॅक्सी चालक व मालकांचे प्रश्न सुटावे यासाठी आम्ही परिवहन सेवेची टास्क फोर्स बनवली असून, यामार्फत दरमहा चालक व मालकाला १० हजार देण्यात यावे, रिक्षासाठी चालक-मालकानं कर्ज काढलं आहे ते व्याजासकट माफ करावं, जप्त केलेल्या रिक्षा तातडीनं सोडाव्यात, दंडात्मक कारवाई मागे घेत रकमेची परफेड करावी, इ-चलन रद्द करावे. तसंच, ज्या रिक्षा चालकांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत करावी, या मागण्या केल्या आहेत. 



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा