Advertisement

१५ एप्रिलपासून ट्रेन सुरू होणार?, रेल्वे मंत्रालयाने दिलं ‘हे’ उत्तर

देशात १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन (lockdown) घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजेच १५ एप्रिलपासून देशातील रेल्वेसेवा नियमितपणे सुरू होईल, असं म्हटलं जात आहे. यावर रेल्वे मंत्रालयाकडून पहिल्यांदाचा खुलासा करण्यात आला आहे.

१५ एप्रिलपासून ट्रेन सुरू होणार?, रेल्वे मंत्रालयाने दिलं ‘हे’ उत्तर
SHARES

कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग पसरू नये म्हणून देशभरातील दळणवळण सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामध्ये भारतीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या भारतीय रेल्वेचा (Indian railway) प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. देशात १४ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन (lockdown) घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर म्हणजेच १५ एप्रिलपासून देशातील रेल्वेसेवा नियमितपणे सुरू होईल, असं म्हटलं जात आहे. यावर रेल्वे मंत्रालयाकडून पहिल्यांदाचा खुलासा करण्यात आला आहे.

हेही वाचा - Coronavirus Updates: रेल्वे रद्द; प्रवाशांच्या खात्याच पैसे जमा

कोरोना व्हायरसशी (covid-19) मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी २४ मार्च रोजी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लाॅकडाऊन (lockdown) जाहीर केला. हा लाॅकडाऊन १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर लाॅकडाऊन सुरू राहील की नाही, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. या लाॅकडाऊनमुळे १४ एप्रिलपर्यंत ज्या प्रवाशांनी विविध मार्गांवर तिकीटं आरक्षित केली होती. त्या सर्वांचं आरक्षण रद्द करून रेल्वेकडून त्यांना तिकीटाचे पैसे परत दिले जात आहेत.

दरम्यान, लाॅकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरू होईल. प्रवाशांना पुन्हा एकदा तिकीटाचं आरक्षण करता येईल, अशा चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहेत. प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतल्यानंतर अखेर रेल्वे मंत्रालयाकडून (railway ministry) त्यावर खुलासा करण्यात आला आहे. १५ एप्रिलपासून सेवा पूर्ववत करण्याचा कुठलाही अधिकृत निर्णय भारतीय रेल्वेकडून घेण्यात आलेला नाही. रेल्वेसेवा केव्हापासून पूर्ववत होईल, याचा निर्णय नंतरच घेण्यात येईल, असं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा - बेस्टप्रमाणं एसटी कर्मचाऱ्यांनाही हवा प्रोत्साहनभत्ता; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

लाॅकडाऊनमुळे सध्या देशांतील विविध मार्गांवर धावणाऱ्या १३,५२३ ट्रेन स्थगित करण्यात आल्या आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी विविध मार्गांवर मालगाड्या चालवण्यात येत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा