बेस्टप्रमाणं एसटी कर्मचाऱ्यांनाही हवा प्रोत्साहनभत्ता; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

बेस्टप्रमाणे एसटीदेखील अत्यावश्यक वाहतूक चालवत असल्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांना प्रवासी भत्ता देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.

बेस्टप्रमाणं एसटी कर्मचाऱ्यांनाही हवा प्रोत्साहनभत्ता; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी
SHARES

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ३०० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. बेस्टप्रमाणे एसटीदेखील अत्यावश्यक वाहतूक चालवत असल्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांना ५०० रुपये प्रवासी भत्ता देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात एसटी महामंडळ अत्यावश्यक वाहतूक करत आहे. 

बेस्ट प्रशासनानं २३ मार्च ते १४ एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी दैनंदिन सेवा देणाऱ्या बेस्ट कामगारांना ३०० रुपयांचा भत्ता जाहीर केला आहे. कोरोना व्हायरसमुळं २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर, परिचारिका, महापालिका कर्मचारी, पोलिस, बँक कर्मचारी, राज्य सरकारी आणि इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेकरता कार्यरत आहेत.

कामावर येण्यासाठी व पुन्हा घरी जाण्यासाठी एसटीच्या जवळपास ३५० ते ४०० बस अत्यावश्यक सेवा म्हणून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे बेस्टच्या धर्तीवर एसटी महामंडळानेसुद्धा ५०० रुपये इतका भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.हेही वाचा -

मुंबई सेंट्रलमधील वोक्हार्ड रुग्णालय सील

Coronavirus Updates: मंत्रालयात मास्कशिवाय प्रवेश नाहीसंबंधित विषय