मुंबई सेंट्रलमधील वोक्हार्ड रुग्णालय सील


मुंबई सेंट्रलमधील वोक्हार्ड रुग्णालय सील
SHARES

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील ओपीडीसह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. वोक्हार्ट रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सच्या वैयक्तिक सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेण्यात न आल्यानं रुग्णालयातील १० जणांना करोनाची लागण झाल्याचा आरोप नर्सच्या नातेवाईकांनी केला होता. परंतु, यामध्ये तथ्य नाही असं या रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु, आता अखेर हे वोक्हार्ट रुग्णालयानं ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करून रुग्णालय बंद केलं आहे.

वोक्हार्ट रुग्णालयातील रुग्णालयातील ओपीडीसह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. संसर्ग वाढल्यापासून या रुग्णालयामधील दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना प्रकृती स्थिरावल्यानंतर घरी पाठवण्यात आलं होतं. या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचणी अहवालाची प्रतीक्षा असून, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यात येत असल्याचं रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

कस्तुरबा रुग्णालयातून करोनाबाधित आणि संशयित असे प्रत्येकी २ रुग्ण २० मार्चला या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधील लागण झालेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले. परंतु, संशयित रुग्णांना इतर रुग्णांसोबत अतिदक्षता विभागात ठेवले. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सना एन ९५ मास्क, करोनाप्रतिबंधक पोशाख अशी कोणतीही सुरक्षा साधने दिली गेली नाहीत. 

या दोन्ही संशयितांना करोनाचा संसर्ग झाल्याचे पुढील तपासणीत आढळले. परंतु तोपर्यंत त्यांच्या संपर्कात रुग्णालयातील अनेक कर्मचारी आले होते. अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या २ नर्सना करोनाची लागण झाली. पुढील काही दिवसांत एकूण १० नर्सना संसर्ग झाल्याचं आढळून आल्याचा आरोप नर्सच्या नातेवाईकांनी केला होता.

रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे परिचारिकांना करोनाची लागण झाली असून, संपर्कात आलेल्या आणि विलगीकरण कक्षात काम करणाऱ्या अशा सर्व नर्सना एकाच वॉर्डमध्ये राहण्याची सुविधा केली असून नियमावलीनुसार वेगळं राहणाच्या सूचनांचं पालन केलं जात नाही, अशी माहिती पारिचारिकांच्या नातेवाईकांनी दिली आहे.हेही वाचा -

Coronavirus Updates: मंत्रालयात मास्कशिवाय प्रवेश नाही

Coronavirus : महाराष्ट्रावर कोरोनाचं सावट, यंदाची वारी रद्दसंबंधित विषय