Advertisement

मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली'या विशेष ट्रेनचं आरक्षण १८ मेपर्यंत फूल्ल

मंगळवारपासून मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली या मार्गावर रेल्वे धावणार आहेत.

मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली'या विशेष ट्रेनचं आरक्षण १८ मेपर्यंत फूल्ल
SHARES

लॉकडाऊन जाहिर झाल्यापासून देशभरातले मजूर, कामगार वेगवेगळ्या राज्यात अडकले गेले. त्यानंतर तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळात या मजूरांना कामगारांना आपआपल्या राज्यात परत पाठवण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार, मंगळवारपासून मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली या मार्गावर रेल्वे धावणार आहेत. तसंच, त्यासाठी 'मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली'या विशेष ट्रेनचं आरक्षण १८ मेपर्यंत फूल्ल झाल्याची माहिती समोर येत आहे.

या विशेष गाडीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ९० मिनिटे आधी रेल्वे स्थानक गाठावं लागणार आहे. मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजता ही गाडी मुंबई सेंट्रलहून दिल्लासाठी रवाना होणार असून, सूरत, वडोदरा आणि कोटा या रेल्वेस्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरुवातीला सोमवारी ४ वाजता विशेष एक्स्प्रेसचे आरक्षण खुले करण्यात येणार होतं. मात्र, गाडीचे तपशील यंत्रणेत भरण्यात विलंब झाल्यानं संध्याकाळी ६ वाजता एक्स्प्रेसचे आरक्षण सुरू झालं.

हेही वाचा - लवकरच परप्रांतीयासाठी मुंबईतून सुटू शकते विशेष ट्रेन

आरक्षण सुरू होताच काही मिनिटांत १८ मेपर्यंतचे तिकीट आरक्षित करण्यात आलं. दरम्यान, आरक्षण लांबल्यामुळं काही प्रवाशांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. आगाऊ आरक्षणाचा कालावधी हा जास्तीत जास्त सात दिवसांचा आहे. राजधानी एक्स्प्रेसप्रमाणे विशेष रेल्वेचे तिकीट दर या गाड्यांना लागू आहेत. ही संपूर्ण गाडी वातानुकूलित असणार आहे.

प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा सर्व प्रवर्गातून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. प्रवास करण्याआधी प्रत्येक प्रवाशांना थर्मल तपासणी होणार आहे. यासाठी प्रवासाच्या ९० मिनिटे आधी स्थानकावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. प्रवाशांना गाडीत चादर, बेडशीट पुरवण्यात येणार नाही. यामुळे प्रवाशांनी स्वत: या वस्तू घेऊन याव्यात. नवी दिल्लीवरून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना स्थानक ते घर हा प्रवास करण्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे, अशा सूचना रेल्वे मंत्रालयाने राज्य सरकारला केल्या आहेत.



हेही वाचा -

Coronavirus Pandemic: मुंबईत कोरोनाचे 791 नवे रुग्ण, दिवसभरात 20 जणांचा मृत्यू

राज्यातील 25 हजार कंपन्यांचं उत्पादन सुरू - उद्योगमंत्री सुभाष देसाई



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा