Advertisement

डहाणू-चर्चगेट लोकल चालविण्याची परिचारिकांची मागणी


डहाणू-चर्चगेट लोकल चालविण्याची परिचारिकांची मागणी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनानं लोकल सेवा सुरू केली. १५ जून पासून ही लोकल सेवा सुरू झाली असून, लोकलमध्ये गर्दी होत असल्यामुळं लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. दरम्यान, लोकल सुरू होऊन बुधवारी एक महिना पूर्ण झाला मात्र, तरीही अद्याप कर्मचारी वर्गाला लोकल प्रवास हवातसा मिळत नाही. त्यामुळं अजूनही रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबईतील रुग्णालयांमध्ये पालघर, डहाणू येथून अनेक कर्मचारी कामसाठी येत आहेत. परंतु, लोकल सेवा अपूरी पडत असल्यानं मोठ्या समस्यांचा समाना करावा लागत आहे.

मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेनं डहाणू ते विरार आणि विरार ते डहाणू अशा अतिरिक्त २ मेमू फेऱ्या १६ जुलैपासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, डहाणू ते विरार मेमू ऐवजी डहाणू ते चर्चगेट लोकल चालवण्याची मागणी परिचारिकांनी केली आहे. यासाठी खासदारांकडूनही पाठपुरावा केला जात आहे. डहाणू, पालघर, बोईसर, वानगाव, सफाळे, वैतरणा यासह अन्य भागांतून कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय, बोरीवलीतील सावित्रीबाई फु ल रुग्णालय याशिवाय भगवती रुग्णालय, कूपर, मुंबईतील नायर, केईएमसह अन्य रुग्णालयात जाणाऱ्या परिचारिका, वॉर्डबॉय व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.

डहाणू येथून पहाटे ५ वाजता बोरीवलीला जाणारी मेमू लोकल बंद करून १ जुलैपासून पहाटे ५.४० वाजताची डहाणू ते विरार लोकल सुरू के ली. त्यामुळे अनेकांना विरार येथे उतरून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दुसरी लोकल पकडावी लागते. दुहेरी मनस्ताप होतानाच सकाळी ७ च्या पाळीलाही एक तास उशिराने वैद्यकीय कर्मचारी पोहोचत आहेत. त्यामुळे पहाटेची ५ वाजता डहाणू येथून चर्चगेटला जाण्यासाठी लोकल सुरू करण्याची मागणी होती.

परंतु, पश्चिम रेल्वेने १६ जुलैपासून पहाटे ४.५० वाजताची डहाणू ते विरार मेमू लोकल फे री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सावित्रीबाई फु ले रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका सोनाली घरत यांनी पहाटे ४.५०ची मेमू चालवण्याला विरोध नसल्याचे सांगितले. मात्र ती मेमूऐवजी डहाणू ते चर्चगेट लोकल चालवण्यात यावी. जेणेकरून मुंबईपर्यंत जाणाऱ्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होईल. हीच मागणी अगोदरपासून पश्चिम रेल्वेकडे के ल्याचे त्या म्हणाल्या. गुरुवारपासून विरार येथून डहाणूसाठीही रात्री १०.५५ वाजता मेमू सोडण्यात येणार आहे.



हेही वाचा -

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा