Advertisement

इंधन दरवाढीमुळं महागला प्रवास; कर्मचाऱ्यांच्या खर्चात वाढ

पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ झाल्यानं खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

इंधन दरवाढीमुळं महागला प्रवास; कर्मचाऱ्यांच्या खर्चात वाढ
SHARES

लॉकडाऊनच्या काळात वाहतूक सेवा सामान्यांना बंद असल्यानं कार्यालयात जाण्यासाठी खासगी वाहनांनी जावं लागत आहे. परिणामी खिशाला कात्री लागत असल्यानं आता अनेकांना आर्थिक समस्या सतावू लागल्या आहेत. अशातच इंधन दरवाढीमुळं आणखी खर्चात वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ झाल्यानं खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी रेल्वेअभावी ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार परिसरांत राहणाऱ्या नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. बसगाड्यांनी प्रवास करण्यासाठी सकाळच्या वेळी तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळं कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरातील अनेक कर्मचारी गटागटानं खासगी वाहनानं प्रवास करत आहेत.

एका कर्मचाऱ्याच्या वाहनातून प्रवास करण्याच्या मोबदल्यात इंधनखर्च विभागून दिला जातो. मात्र गेल्या पंधरवडय़ापासून दररोज इंधनाचे दर वाढत असल्याने प्रवासासाठीच्या खर्चात दररोज वाढ होत आहे. बदलापूर, कल्याण, अंबरनाथ या भागांतून मुंबईत येणाऱ्या वाहनाला आठवड्याला तब्बल ३ ते ४ हजार रुपयांचे इंधन लागतं. महिन्याला हा खर्च १५-१६ हजारांच्या घरात जातो. परिणामी एका वाहनातून प्रवास करणाऱ्या ४ कर्मचाऱ्यांना महिन्याला ३-४ हजार रुपये मोजावे लागत आहेत.हेही वाचा -

मृत्यू दर घटवण्यासाठी बीएमसीची 'सेव्ह लाइव्ह्स स्ट्रॅटेजी' मोहिम

मिरा-भाईंदरमध्ये कोरोना मृतांमध्ये ५० ते ७० वयोगटातील रुग्ण अधिकRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा