Advertisement

मृत्यू दर घटवण्यासाठी बीएमसीची 'सेव्ह लाइव्ह्स स्ट्रॅटेजी' मोहिम

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याबरोबरच रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे.

मृत्यू दर घटवण्यासाठी बीएमसीची 'सेव्ह लाइव्ह्स स्ट्रॅटेजी' मोहिम
SHARES
Advertisement

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याबरोबरच रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढत आहे.  हा वाढता मृत्यू दर कमी करण्यासाठी मुंबई महापालिका (बीएमसी) आता 'सेव्ह लाइव्ह्स स्ट्रॅटेजी' मोहिम राबवत आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी या मोहिमेची सुरुवात केली. यामध्ये मुंबईत एक खास प्रोटोकॉल लागू केला आहे.


या प्रोटोकॉलनुसार, मध्यम, कमी गंभीर आणि गंभीर श्रेणीतील कोरोना प्रकरण अशा सर्व केस रुग्णालयांना घ्याव्याच लागतील. वरिष्ठ आणि कनिष्ठ डॉक्टरांच्या दिवसातून दोनदा व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून बैठका होतील. डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी एक टीम म्हणून काम करणार आहेत. 


प्रोटोकॉलनुसार, प्रत्येक दस्ताऐवजवर प्रोटोकॉल आणि चेक बॉक्स तयार होणार आहे. रुग्णालयात ऑक्सिजन लावलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन मास्क टॉयलेटला जाताना हटवला जातो. हेच अनेक मृत्यूंचे कारण बनल्याचे सुद्धा सांगितले जाते. प्रामुख्याने रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचं प्रमाण अधिक. त्यामुळे प्रत्येक बेडवर बेड पॅन आणि ४ बेडसाठी एक कोमोड लावला जाईल. जेणेकरून युरीन आणि टॉयलेटसाठी रुग्णाचा ऑक्सिजन मास्क काढून बाथरुम/टॉयलेटला पाठवण्याची गरज भासणार नाही.


अँटीव्हायरल्स, स्टेरॉयड आणि प्लाझ्माचा पुरवठा सुरळीत केला जाईल. त्यांचा वापर आवश्यक त्या रुग्णांवर होईल. यूनिटचे हेड आणि इस्टिट्युशनचे हेड यांच्याकडून प्रत्येक प्रकरणाची व्हिडिओवरून पाहणी होत राहील. प्रत्येक मृत्यूचे विस्तृत असे विश्लेषण केले जाईल.


देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७६,७६५ झाली आहे. तर ४४६३ जणांचा मृत्यू झाला.  मुंबईतील ५७ टक्के रुग्ण करोनामुक्त झालेले असले तरी मृत्यूदर गेल्या काही दिवसात ५.८ टक्क्यांवर गेला आहे. मृतांमध्ये ५० वर्षांवरील रुग्णांचा मोठय़ा संख्येने समावेश आहे.हेही वाचा -

Mumbai Local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

Marathi Compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय
संबंधित विषय
Advertisement