Advertisement

ठाणे-वाशी लोकल सुरू, ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा


ठाणे-वाशी लोकल सुरू, ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा
SHARES

लॉकडाऊनचे मागील ३ महिने बंद असलेली लोकल पुन्हा सुरू करण्यात आली. लोकल सुरू झाल्यानं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सुरू करण्यात आली आहे. सध्यस्थितीत मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी लोकल आता ट्रान्स हार्बर मार्गावर सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी सोमवारपासून ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे.

ठाणे - वाशी - ठाणे या स्थानकादरम्यान २ लोकल फेऱ्या धावत आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून लोकल सुरु झाली होती. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावरून लोकल प्रवास सुरु झाला नाही. परिणामी, येथील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करताना अडचणी येत होत्या. मात्र, सोमवारपासून ट्रान्स हार्बर मार्गावरून लोकल धावण्यास सुरूवात झाली आहे.

पहिली लोकल ठाणे येथून सकाळी वाशी स्थानकाच्या दिशेनं रवाना झाली. ठाण्याकरिता विशेष लोकल वाशी येथून संध्याकाळी सुटणार आहे. या विशेष लोकलला रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे आणि सानपाडा या स्थानकांवर थांबा देण्यातं निश्चित करण्यात आलं आहे. राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यासाठी मुंबई विभागातील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सध्या ७०० लोकल फेऱ्या धावत आहेत.

ठाणे - वाशी - ठाणे या स्थानकादरम्यान २ लोकल फेऱ्या धावत आहे. निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना या लोकल फेऱ्यामधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर प्रवाशांनी स्थानकावर गर्दी न करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.



हेही वाचा -

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची बाधा, नानावटी रुग्णालयात दाखल

उद्धवा! लाॅकडाऊन की अनलाॅक, काय ते ठरवा!!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा