मध्य, ट्रान्स हार्बरवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

 Navi Mumbai
मध्य, ट्रान्स हार्बरवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

दिघा - मध्य रेल्वेची आणि ट्रान्स हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिघा येथील एमआयडीसीच्या भूखंडावर बेकायदा उभ्या असलेल्या इमारतींवर सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईच्याविरोधात दिघावासीयांसोबतच कळव्याचे नागरिकही रेल्वे रुळावर उतरले. या वेळी दिघावासीयांनी वाशीहून ठाण्याकडे येणारी वाहतूक रोखली, तर कळव्यातील झोपडपट्टीवासीयांनी मध्य रेल्वेच्या लोकलपुढे रेलरोको केल्याने जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. जनतेला रुळावरून बाजूला करण्याचे प्रयत्न पोलीस आणि प्रशासन करत असल्याचं समजतं. या आंदोलनाबाबत मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर माहिती दिली जात आहे.

Loading Comments