Advertisement

लोकल प्रवासात रांगेची नो झंझट, मोबाईल तिकीटासाठी 'क्यूआर कोड'चा नवा पर्याय

तुम्हाला तिकीट काढण्यासाठी जीपीएस उपलब्ध होत, नसेल तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या 'क्यूआर कोड' ला स्कॅन करुन तिकीट मिळवू शकता. मोबाईल तिकीटासाठी हा 'क्यूआर कोड' चा नवा पर्याय देण्यात आला आहे. सध्या या 'क्यूआर कोड'वर काम सुरू असून दोन दिवसानंतर प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहीती क्रिसकडून देण्यात आली.

लोकल प्रवासात रांगेची नो झंझट, मोबाईल तिकीटासाठी 'क्यूआर कोड'चा नवा पर्याय
SHARES
Advertisement

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत उभं रहायला लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने यूटीएस मोबाईल अॅप सुरू केलं. त्यात आतापर्यंत अनेक सुविधा आणि पर्याय देण्यात आले आहेत. याचसोबत प्रवाशांना आणखी एक पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न 'रेल्वे सूचना प्रणाली केंद्र' म्हणजेच 'क्रिस'ने केला आहे. हा पर्याय आहे 'क्यू आर कोड'चा.


कसा मिळेल फायदा?

तुम्हाला तिकीट काढण्यासाठी जीपीएस उपलब्ध होत, नसेल तर तुम्ही रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या 'क्यूआर कोड' ला स्कॅन करुन तिकीट मिळवू शकता. मोबाईल तिकीटासाठी हा 'क्यूआर कोड' चा नवा पर्याय देण्यात आला आहे. सध्या या 'क्यूआर कोड'वर काम सुरू असून दोन दिवसानंतर प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहीती क्रिसकडून देण्यात आली.

हा 'क्यूआर कोड' मध्य रेल्वेच्या ५ आणि पश्चिम रेल्वेच्या ५ रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडकीजवळ प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात येणार आहे. यूटीएस अॅपमध्ये 'स्कॅन क्यू आर कोड' असा पर्याय तुम्हाला उपलब्ध होईल. अनेकदा जीपीएस नेटवर्क सिस्टिम योग्य पद्धतीने काम करत नाही, अशी तक्रार प्रवाशांनी केली होती. त्यासाठीच हा नवा पर्याय प्रवाशांना देण्यात आला आहे.


'या' स्थानकांवर सुविधा

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, ठाणे, डोबिंवली आणि कल्याण या ५ स्थानकांवर प्रायोगिक तत्त्वावर 'क्यूआर कोड' लावण्यात येणार आहेत. यापैकी सीएसएमटी या स्थानकांत गुरूवारपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली या स्थानकांवर 'क्यूआर कोड' लावण्यात येणार आहेत.का आणला 'क्यूआर कोड'चा पर्याय?

रेल्वे हद्दीत ३० मीटरपर्यंत असल्यास जीपीएस यंत्रणेद्वारे मोबाईल तिकीट काढता येतं. मात्र, जीपीएस नेटवर्कची समस्या आल्यानंतर तिकीट खिडक्याजवळ उपलब्ध करुन दिलेल्या क्यूआर कोडचा पर्याय देण्यात आल्याचं क्रिसचे (मुंबई विभाग) महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितलं. या जीपीएस नेटवर्कच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी सुरूवातीला हा 'क्यूआर कोड' उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शिवाय, पेपरलेस मोबाईल तिकीट प्रणाली या संकल्पनेला आतापर्यंत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याचंही बोभाटे यांनी सांगितलं.


७ लाखांपेक्षा जास्त यूझर्स

मोबाईल तिकीट या संकल्पनेचा आतापर्यंत ७ लाख ५ हजार २३ प्रवाशांनी वापर केला आहे. मंगळवारी एका दिवसांत मध्य रेल्वेवर ९ हजार ४१६ तिकीटांचं बुकींग करण्यात आलं आहे. त्यात एकूण १२ हजार ५३१ प्रवासी होते. तर त्यातून १ लाख ४९ हजार ३० रुपये एवढा फायदा मध्य रेल्वेला झाला.

तर, पश्चिम रेल्वेवर ७ हजार १५८ तिकीटांचं बुकींग करण्यात आलं आहे. ९ हजार ९९८ प्रवाशांचा त्यात सहभाग होता. तर, त्यातून १ लाख २८ हजार ६०० रुपयांचा फायदा पश्चिम रेल्वेला झाला. यात सिझन तिकीटांचाही समावेश आहे.हेही वाचा-

निधी मिळाला! उपनगरीय रेल्वेची कामे फास्ट ट्रॅकवर


संबंधित विषय
Advertisement