Advertisement

'त्या' बेस्ट बस चालकाचा मृत्यू

भरधाव वेगानं येणाऱ्या बेस्टच्या तेजस्विनी बसनं पुढे उभा असलेल्या डंपरला धडक दिली.

'त्या' बेस्ट बस चालकाचा मृत्यू
SHARES

बुधवारी सकाळी दादर टीटी परिसरात बेस्टच्या तेजस्विनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातामधील जखमी बसचालक राजेंद्र काळे यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय बसवाहकाची ही स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ जण गंभीर जखमी असून, ३ जणांना रुग्णालयात अॅडमीट केलं आहे. तसंच, ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भरधाव वेगानं येणाऱ्या बेस्टच्या तेजस्विनी बसनं पुढे उभा असलेल्या डंपरला धडक दिली. या अपघातात ५२ वर्षीय बसचालक राजेंद्र काळे आणि ५७ वर्षीय कंडक्टर काशीराम धुरी यांच्यासह ४ जण गंभीर जखमी झाले होते. १६ आणि १७ वयोगटातील २ तरुणांसह ४ जणांना किरकोळ दुखापत झाली.

या अपघातातील जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सूरू आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दादर टीटी सर्कलजवळील सिग्नलवर डंपर थांबला होता. यावेळी मागून येणाऱ्या बेस्टच्या तेजस्वीनी बस चालकाचा ताबा सुटला आणि बस भरधाव वेगात पुढे उभा असलेल्या डंपरला धडकली. सदर बस मरोळ ते पायधुनी मार्ग क्रमांक २२ वर जात असताना दादर येथे हा अपघात झाला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा