Advertisement

दादर-सावंतवाडी स्पेशल रेल्वेला दिवा स्थानकात थांबा


दादर-सावंतवाडी स्पेशल रेल्वेला दिवा स्थानकात थांबा
SHARES

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्यरेल्वे प्रशासनाने दादर-सावंतवाडी स्पेशल रेल्वेला दिवा स्थानकात थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाण्यापुढील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

दादर-सावंतवाडी (01113) स्पेशल ट्रेन 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी दादरहून सकाळी 7.50 वाजता सुटणार असून सावंतवाडीला त्याचदिवशी संध्याकाळी 7.50 वाजता पोहचणार आहे. ही ट्रेन दिवा स्थानकात सकाळी 8.35 वाजता येईल, तर परतीच्या प्रवासासाठी (01114) सावंतवाडी-दादर स्पेशल ट्रेन ही 19 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी पहाटे 4.50 वाजता सुटणार असून दादरला त्याच दिवशी दुपारी 4 वाजता पोहचणार आहे. 

ही रेल्वे दिवा स्थानकात दुपारी 3 वाजता येईल. या गाडीला ठाणे, दिवा, पनवेल, रोहा, मानगांव, वीर, खेड, चिंपळून, सावर्डे, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कनकवली, सिंधुदूर्ग, कुडान आणि झराप या स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे.


हेही वाचा -  

तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना उकडीच्या मोदकाची मेजवानी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा