Advertisement

तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना उकडीच्या मोदकाची मेजवानी!


तेजस एक्स्प्रेसच्या प्रवाशांना उकडीच्या मोदकाची मेजवानी!
SHARES

गणेशोत्सव काळात तेजस एक्स्प्रेसने कोकणात जाणार असाल तर तुमच्यावर बाप्पा प्रसन्न होणार आहे! कारण गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत जे प्रवासी तेजस एक्स्प्रेसने प्रवास करतील, त्यांना प्रवासादरम्यान उकडीचे मोदक देण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम(आयआरसीटीसी)तर्फे प्रवाशांना मोदकांचे वाटप केले जाणार आहे.


रेल्वे प्रशासनाचा स्पेशल प्रयोग!

अत्यंत आरामदायी, वेगवान, स्वयंचलित दरवाजे आणि सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या एक्स्प्रेसचे उद्घाटन 21 मे रोजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले होते. या एक्स्प्रेसला प्रवाशांची तुफान पसंती दिली आहे. त्यामुळे या एक्स्प्रेसची गर्दी अशीच कायम ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध प्रयोग करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांना उकडीचे मोदक देण्यात येणार आहेत.

25 ऑगस्टला गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गाड्या आधीच फुल्ल झालेल्या आहेत. यामध्ये कोकणात जाणाऱ्या नेहमीच्या तसेच गणपतीसाठी सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांचा देखील समावेश आहे. गेल्या वर्षी मुंबई-दिल्ली या राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना गणेशोत्सवादरम्यान उकडीच्या मोदकांची मेजवानी देण्यात आली होती. त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला होता. 



हेही वाचा - 

नव्या कोऱ्या 'तेजस एक्स्प्रेस'मध्ये सुविधांचा बोजवारा

'तेजस'ला मिळणार दमदार इंजिन, वेग ताशी 200 किमी!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा