'तेजस एक्स्प्रेस'ला कणकवलीमध्ये थांबा द्या - अरविंद सावंत

 Mumbai
'तेजस एक्स्प्रेस'ला कणकवलीमध्ये थांबा द्या - अरविंद सावंत

'तेजस एक्स्प्रेस'मुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास हायफाय झाला असला तरी या गाडीला कोकणात केवळ रत्नागिरी आणि कुडाळ हे दोनच थांबे देण्यात आल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमिवर खासदार अरविंद सावंत यांनी कणकवली येथे थांबा देण्याची मागणी केली. तशा प्रकारचे लेखी पत्र देखील त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिले. तसेच एसी डबल डेकर बंद करण्याचा घाट घातलेल्या मध्य रेल्वेच्या आधिकाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरले आहे.कर्नाटक येथील ‘जय महाराष्ट्र’ वादाचा दाखला देत खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मराठी शिका आणि मराठीतच बोला, असा सज्जड दम दिला. त्याचबरोबर सूत्रसंचालन करणाऱ्या अधिकाऱ्याला छत्रपती शिवाजी ‘महाराज’ टर्मिनस असा उल्लेख करा, अशी आठवण करून दिली. यावेळी रेल्वेने डबलडेकर ट्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, 'तेजस'ला कणकवली येथे थांबा द्यावा अशी मागणी सावंत यांनी यावेळी केली. 'तेजस'ला केवळ पाच थांबे देण्यात आले आहेत. पण कणकवलीच्या प्रवाशांनी काय करायचे हे देखील रेल्वे प्रशासनाने स्पष्ट करावे असा सवाल सावंत यांनी विचारला आहे.

Loading Comments