मुंबई-गोवा प्रवास आणखी आरामदायी

  Mumbai
  मुंबई-गोवा प्रवास आणखी आरामदायी
  मुंबई  -  

  मुंबईतून कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूषखबर आहे. येत्या जूनपासून मुंबई ते गोवा हा प्रवास अधिक सुखकर होणार असून या मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी 'तेजस' ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

  तेजस ही नवी आरामदायी ट्रेन 20 डब्यांची असेल. तसेच, या ट्रेनला स्वयंचलित दरवाजे आणि प्रवाशांना शेवटच्या डब्यापर्यंत जाता यावे यासाठी आत गँगवे देखील असणार आहे. यासह या ट्रेनमधील प्रत्येक सीटसमोर टीव्ही असल्याने हा प्रवास अधिक मनोरंजक ठरणार आहे. 

  तेजस एक्स्प्रेस येत्या 1 जूनपासून प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या ट्रेनमध्ये बायो व्हॅक्यूम शौचालय, हँड ड्रायर, वाय-फायची सुविधा देखील असेल. ही ट्रेन मुंबई-गोवा मार्गावर सुरू झाल्यानंतर दिल्ली-चंदिगड मार्गावरही अशीच सेवा सुरू करण्यात येईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.