Advertisement

बेस्टच्या ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

कोरोनाशी लढणाऱ्या बेस्टच्या ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

बेस्टच्या ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू
SHARES

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुक सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमात कोरोनाग्रस्त कामगारांची संख्या ४०पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये आतापर्यंत कोरोनाशी लढणाऱ्या ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसंच, ९ कामगारांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. बेस्टकडून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी विशेष फेऱ्या चालविल्या जात आहेत.

लॉकडाउनपासून ही सेवा सुरू असून त्यात कामगारांना अपुऱ्या सुविधाशी झगडावे लागत असल्याची तक्रार अजूनही कायम आहे. ही सेवा देताना अनेक अडचणींना बेस्टचा कामगारांना तोंड द्यावे लागत आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगार आणि कामगारांची संख्या विषम स्वरूपात आहे. त्यामुळेच बसमध्ये सुरक्षित वावराचं बंधन पाळले जात नसल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आहे.

या स्थितीत बेस्ट कामगारांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळं कामगारवर्गांमध्ये काळजीचं वातावरण पसरले आहे. प्रशासनानं कामगारांसाठी वेळीच काळजी घेणं आवश्यक होतं, असं कामगारांचं म्हणणं आहे. कोरोनाग्रस्त कामगारांची संख्या वाढत असतानाच सोमवारी लागण झालेल्या ५ कामगारांनी कोरोनावर मात केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा