Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कधी सुटणार? पुढील बैठकीत होणार निर्णय


एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कधी सुटणार? पुढील बैठकीत होणार निर्णय
SHARES

कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाला वाहतूक सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या वेतनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जुलै महिन्याचे वेतन ऑगस्ट महिना संपत आला असतानाही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वेतनसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असल्याचं समजतं. त्यामुळं कर्मचाऱ्यांना वेतन कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वेतन लांबणीवरच पडत असल्यानं अनेक कर्मचाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. कोरोना आणि निर्बंधांमुळं एसटीचे उत्पन्न घटले. त्यामुळं गेल्या वर्षांपासूूनच वेतन देणेही अवघड झाले आहे. एसटीला दैनंदिन खर्चासाठी पैसा अपुरा पडू लागल्याने महामंडळाने राज्य शासनाकडे मदतनिधी मागितला. त्यानुसार शासनाने निधी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या सहा महिन्यांचे वेतन देण्यात आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही एसटीचे प्रवासी आणि उत्पन्न वाढले नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यापासून पुढे वेतन व अन्य खर्चासाठी एसटी महामंडळाच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिला नाही. परिणामी राज्यातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन अद्याप झालेले नाही. वेतनावर तोडगा काढावा यासाठी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटलांकडेही एसटीतील संघटनांनी मागणी केली आहे.

यासंदर्भात सतेज पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून दरवेळी निधी उपलब्ध झाला. परंतु करोनाकाळात शासनाच्या तिजोरीतही पुरेसा पैसा नाही. तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न के ला जात आहे. पुढील आठवडय़ात बैठक होऊन तोडगा निघेल, अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा