Advertisement

स्वयंचलित दरवाजावर प्रवासी नाखूश; ट्रेनमध्ये घुसमट होत असल्याची तक्रार

पश्चिम रेल्वेनं साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले आहेत.

स्वयंचलित दरवाजावर प्रवासी नाखूश; ट्रेनमध्ये घुसमट होत असल्याची तक्रार
SHARES

रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना गारेगार प्रवासाची संधी मिळावी यासाठी एसी लोकल सुरू केली. या लोकलला सामान्या लोकलसारखे दरवाजे नसून स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहे. या एसी लोकलच्या धरतीवर आता पश्चिम रेल्वेनं साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले आहेत. तसंच, या लोकलची पश्चिम मार्गावर चाचणी घेतली. यावेळी प्रवाशांना कल्पना नसल्यामुळं ही सुविधा पश्चिम रेल्वेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

श्वास घेताना अडचणी

साध्या लोकलला बसविण्यात आलेल्या स्वयंचलित दरवाज्यांमुळं कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढून प्रवाशांना श्वास घेताना अडचणी येत असल्याचं चाचणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. लोकलमधून पडून होणारे अपघात किंवा फटका गँगचे प्रवाशांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वातानुकूलित लोकलप्रमाणेच साध्या लोकलमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवून चाचणी घेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला. त्यानुसार ३ डब्यांत असे दरवाजे बसवण्यात आले.


लोकलची चाचणी

नव्या वर्षाच्या सुरूवातीच्या आठवड्यात म्हणजे २ ते ५ जानेवारीदरम्यान या लोकलची चाचणी घेण्यात आली. चाचणी अहवालानुसार, सामान्यपणे साध्या लोकलला (धीम्या) चर्चगेट ते बोरिवली हे अंतर पार करण्यासाठी ६५ मिनिटे लागतात. मात्र स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आल्याने यासाठी १० मिनिटे जास्त वेळ लागला. त्यामुळं संपूर्ण लोकलचं वेळापत्रक कोलमडून गेलं. त्याशिवाय, गर्दीच्या वेळेत ही लोकल चालवल्यास प्रवाशांना श्वास घेताना अडचण निर्माण होऊ शकते.



हेही वाचा -

सत्तेचं टाॅनिक संपल्याने भाजपची ‘सूज’ उतरली, सामनातून भाजपवर टीका

मेट्रोचं किमान तिकीट १० रुपये



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा