एकाच नंबर प्लेटच्या दोन बस जप्त

 Andheri
एकाच नंबर प्लेटच्या दोन बस जप्त
एकाच नंबर प्लेटच्या दोन बस जप्त
See all

अंधेरी - अंधेरी आरटीओ पोलिसांनी एकाच नंबरप्लेटच्या दोन बसेसला ताब्यात घेतलंय. आरटीओ पोलिसांनी जनरल ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक MH 04 FK 73 च्या कागदपत्रांची तपासणी केली असता 2011ची नोंदणी असल्याचं समोर आलं. त्यानंतर ही बस जप्त करून अंधेरी पोलीस ठाण्यात नेली. काही काळानंतर आरटीओच्या पोलिसांनी त्याच नंबरची दुसरी बस पाहिली. दोन्ही बसचं मॉडेल आणि नंबरप्लेट एकच असल्याच निदर्शनात आल्यानंतर ती ताब्यत घेण्यात आली. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ आरटीओ पोलीस निरीक्षक आनंदराम वागळे यांनी केली.

Loading Comments