Advertisement

तुतारी एक्सप्रेस उशिरानं, दादर स्थानकांत प्रवाशांचं आंदोलन

गुरुवारी तुतारी एक्सप्रेस रद्द केल्यानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दादर स्थानकात आंदोलन केलं.

तुतारी एक्सप्रेस उशिरानं, दादर स्थानकांत प्रवाशांचं आंदोलन
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळं प्रवाशांची गैस सोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून कोकण मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही सोडण्यात आल्या. परंतु, कोकणात गणेशोत्सवानिमित्त कोकणात निघालेल्या प्रवाशांचे हाल होत असल्याचं समजतं. गुरुवारी तुतारी एक्सप्रेस रद्द केल्यानं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दादर स्थानकात आंदोलन केलं. 

रेल्वे स्थानकात उद्रेक

तुतारी एक्सप्रेस रद्द करण्याच्या घोषणेमुळं गुरुवारी दुपारी प्रवाशांचा दादर रेल्वे स्थानकात उद्रेक झाला. प्रवासी थेट निषेध नोंदवण्यासाठी रेल्वे रुळावर उतरले होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्यांची समजूत घातली. तसंच, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि मागणीमुळं रेल्वेनं आता ही गाडी उशिरानं चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

मुंबईत मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी गैस सोय होत आहे.



हेही वाचा -

राणीबागेत होणार पट्टेरी वाघाचं दर्शन

कोहिनूर घोटाळा: मनसे नेते नितीन सरदेसाईंची 'ईडी'कडून चौकशी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा