Advertisement

ट्रान्सफॉर्मर बिघाडल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत

रे रोड स्थानकादरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानं रेल्वे विस्कळीत झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे.

ट्रान्सफॉर्मर बिघाडल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत
SHARES

सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना ताजी असतानाच संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास हार्बर रेल्वेलाही ब्रेक लागला होता. रे रोड स्थानकादरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानं रेल्वे विस्कळीत झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. तसंच वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, तासाभरापासून वाहतूक विस्कळीत असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर तुडुंब गर्दी झाली आहे.


ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड

रे रोड स्थानकादरम्यान ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानं सहा वाजल्यापासून हार्बरच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. लोकलमध्ये वीजपुरवठा नसल्याने दिवे आणि पंखेही बंद होते. तसंच, वडाळा ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या.



संतापाचे वातावरण

दरम्यान आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळं प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. तसंच, वाहतूक धिम्या गतीनं सुरू असल्यानं प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो आहे. 



हेही वाचा -

शिमग्याला सिनेमागृहांमध्ये नाचणार कोकणातील 'पालखी'!

...आणि धोनीनं राखला तिरंग्याचा मान!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा