Advertisement

...आणि धोनीनं राखला तिरंग्याचा मान!

कुशल नेतृत्वाच्या बळावर भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं नेहमीच खेळ आणि देशाला स्वत:पेक्षाही अधिक महत्त्व दिलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जगभरातील क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली.

...आणि धोनीनं राखला तिरंग्याचा मान!
SHARES

कुशल नेतृत्वाच्या बळावर भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं नेहमीच खेळ आणि देशाला स्वत:पेक्षाही अधिक महत्त्व दिलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जगभरातील क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली.


तिरंग्याचा मान

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं प्रभावी नेतृत्त्वाबरोबरच एक यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिवसेंदिवस अधिकच परिपक्व होणारा धोनी नेहमीच चपळ यष्टीरक्षण आणि तूफान फलंदाजीसाठी चर्चेत असतो. मात्र, भारत वि. न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात धोनीने पुन्हा एकदा प्रसंगावधान राखत भारतीय तिरंग्याचा मान राखला आहे.


क्रिकेटप्रेमींचा सलाम

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यात भारतानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. सामना सुरू असताना पहिल्या डावातील १४ व्या षटकावेळी धोनीचा एक चाहता हातात भारतीय राष्ट्रध्वज घेऊन त्याच्याकडे धावत आला. धोनीच्याजवळ आल्यानंतर तो चाहता धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. त्यावेळी त्याच्या हातातील तिरंगा जमिनीला टेकणार इतक्यात धोनीनं तो हातात घेतला. धोनीचं हे देश आणि राष्ट्रध्वजाबद्दलचं प्रेम पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांसोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींनी त्याला मनोमन सलाम केला.



व्हिडिओ झपाट्याने व्हायरल

धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, सर्वच स्तरांतून त्याचं कौतुक होत आहे. या कृतीमुळे क्रिकेटप्रेमींच्या मनातील धोनीची उंची आणखी वाढली आहे.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेसाठी २८१५ सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर

व्हॅलेंटाईन डेला तरी बोलेल का सलीलचा 'पक्या'?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा