कार्यालय की भंगार गाड्यांचं दुकान

 Chembur
कार्यालय की भंगार गाड्यांचं दुकान

चेंबुर - गेल्या अनेक वर्षांपासून चेंबुरच्या समाज कल्याण कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात भंगार गाड्या पडून आहेत. या सर्वं गाड्या सरकारी असून त्याचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे या गाड्यांचा वापर होत नाही. ह्या गाड्या गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी पडून असल्याने समाज कल्याण कार्यालय परिसरात मोठी अडचण होत आहे. इतर वाहनांना पार्किंगसाठी याठिकाणी जागा मिळत नसल्याने शासनाने या वाहनांची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading Comments