Advertisement

विजेवर चालणारे वाहन खरेदी करतायत? मग हे वाचा!


विजेवर चालणारे वाहन खरेदी करतायत? मग हे वाचा!
SHARES

पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे शहरातील प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याने केंद्र सरकार विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देत आहे. हे प्राधान्य देत असतानाच विजेवर चालणाऱ्या गाड्यांसाठी लागणाऱ्या चार्जिंग पॉईंटची व्यवस्था करणेही तितकेच गरजेचं आहे. कारण मुंबईत फक्त विक्रोळी येथेच ही चार्जिंग पॉईंटची व्यवस्था करण्यात आली आहे.  


एकूण १६ गाड्यांची नोंद

आतापर्यंत मुंबईत चार्जिंगवर चालणाऱ्या एकूण १६ गाड्यांची नोंद आरटीओमध्ये करण्यात आली आहे. यापैकी ताडदेव आरटीओमध्ये ९, अंधेरी आणि बोरिवली मध्ये प्रत्येकी ३ तर वडाळा येथे १ गाडीची नोंद झाली असल्याने मुंबईत फक्त विक्रोळी येथे चार्जिंग पॉईंट उपलब्ध असल्याने वाहन मालकांचा गोंधळ उडत आहे


यामुळे अडचण

पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी २०३० पर्यंत मोठया प्रमाणात विजेवर चालणारी वाहनं रस्त्यावर उतरायला हवीत हे केंद्र सरकारचं उद्दीष्ट्य आहे. नुकतेच बेस्ट प्रशासनाने चार्जिंगवर चालणाऱ्या बसेस रस्त्यावर उतरवल्या. त्यांसाठी चार्जिंगची व्यवस्थाही बेस्टच्या आगारात करण्यात आली आहे. पण इतर वाहनांसाठी लागणारी चार्जिंग पॉईंटची व्यवस्था मुंबईतल्या विक्रोळी या एकाच ठिकाणी करण्यात आल्याने वाहन मालकांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा