Advertisement

रेल्वे प्रवासावेळी अत्यावश्यक सेवा कर्मचारीच करताहेत नियमांचं उल्लंघन

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्य प्रमाणात वाढतो आहे. या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन व राज्य सरकारनं सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवास सुरू ठेवण्यात आला आहे.

रेल्वे प्रवासावेळी अत्यावश्यक सेवा कर्मचारीच करताहेत नियमांचं उल्लंघन
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्य प्रमाणात वाढतो आहे. या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन व राज्य सरकारनं सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवास सुरू ठेवण्यात आला आहे. मात्र असं असतानाही आता अत्यावश्यक सेवा कर्मचारीही लोकल प्रवासात मास्कचा वापर करत नसल्याचं समोर आलं आहे. मास्क न वापरणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर तिकीट तपासनीस दंडात्मक कारवाई करत आहेत. शिवाय, नियमभंग करणाऱ्या प्रवाशांना मोफत मास्क देऊन जनजागृती करण्याची मोहीम मध्य रेल्वेने हाती घेतली आहे.

या उपक्रमानुसार, २ दिवसांत मास्कचा वापर न केलेल्या १०० प्रवाशांना मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक आहे. लोकल प्रवासातही प्रवाशाने मुखपट्टीचा वापर करण्याचे आदेश राज्य शासन, महापालिका व रेल्वेनं दिले आहेत. तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे. मात्र हे कर्मचारीही नियमपालनाबाबत गंभीर नसल्याचं दिसत आहे. लोकल प्रवासात, फलाट किंवा पादचारी पुलांवरून चालताना मुखपट्टी हनुवटीवर ठेवणे किंवा नाकापर्यंत मास्क न घालता फक्त तोंड झाकून ठेवणं किंवा मुखपट्टी खिशात ठेवणं असे प्रकार प्रवासी करतात. अशा प्रवाशांवर पालिकेच्या मार्शलकडून रेल्वे हद्दीत कारवाई केली जाते.

ही कारवाई अधिक तीव्र व्हावी या उद्देशाने रेल्वेलाही दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार १७ एप्रिलपासून रेल्वेकडून कारवाईला सुरुवात झाली. आतापर्यंत मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर मुखपट्टीचा वापर न करणाऱ्या ४८९ प्रवाशांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख ६ हजार ७६५ दंड वसूल केला आहे. परंतु या कारवाईनंतरही मुखपट्टी न लावणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने मुखपट्टी न वापरणाऱ्या प्रवाशांनाच मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून अशा प्रवाशांना आपली चूक समजेल, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. गेल्या दोन दिवसांत सीएसएमटी, कुर्ला, घाटकोपर, दादर, ठाणे यांसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी १०० प्रवाशांना मुखपट्टय़ा देण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा